माझ्याकडून फार मोठी चूक झाली होती, ज्यासाठी मी… भर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा

रोख ठोक भाषण शैलीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांनी भर सभेत आपली चुक कबूल केली आहे. इतकच नाही तर त्यांनी याबाबतचा खुलासा देखील केला आहे. सातारा येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

    सातारा : रोख ठोक भाषण शैलीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांनी भर सभेत आपली चुक कबूल केली आहे. इतकच नाही तर त्यांनी याबाबतचा खुलासा देखील केला आहे. सातारा येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्यातील वडूज गावातील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांच्याकडून ही चुक झाली. सातारा जिल्ह्याचा मी काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी होतो त्यामुळे मला भौगोलिक परिस्थिती माहीत आहे असा अजित पवार यांनी केला. मात्र जिल्हाधिकारी नाही तर तुम्ही पालकमंत्री होता असे व्यासपीठावरील मान्यवरांनी सांगताच अजित दादांनी आपले शब्द बदलले.

    आधीही अशीच एक फार मोठी चूक माझ्याकडून झाल्याचे त्यांनी उपस्थितांसमोर मान्य केले. या चुकीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समधीसमोर आत्मक्लेश करावा लागल्याचे देखील अजित पवार म्हणाले.