shivsena

सातारा व सांगली जिल्ह्याचे प्रमुख संपर्क नेते दिवाकरजी रावते व उपनेते शिव व्याख्याते नितीनजी बानुगडे पाटील त्या खालोखाल जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व चंद्रकांत जाधव आणि सातारा शहरात निलेश मोरे व बाळासाहेब शिंदे असे दोन शहरप्रमुख अशी रचना आहे . या रचनेत तीन वर्षापूर्वी भाजप मधून शिवसेनेत दाखल झालेले सचिन मोहिते हे उपजिल्हा प्रमुख म्हणून सक्रीय आहेत .

  सातारा : राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीत शिवसेना आपला राजकीय दबदबा ठेऊन आहे . राज्याला नगरविकास व गृहराज्यमंत्री असे सक्षम नेतृत्व देणाऱ्या सातारा जिल्ह्यात शिवसेनेत सध्या अंतर्गत गटबाजीचे राजकारण उफाळले आहे . अन्यायाला वाचा फोडून पिडितांना न्याय देण्यापेक्षा मलईदार राजकीय मांडणी सुरु झाल्याने शहर व जिल्हा नेतृत्वात वाद सुरु झाले आहेत .

  सातारा व सांगली जिल्ह्याचे प्रमुख संपर्क नेते दिवाकरजी रावते व उपनेते शिव व्याख्याते नितीनजी बानुगडे पाटील त्या खालोखाल जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व चंद्रकांत जाधव आणि सातारा शहरात निलेश मोरे व बाळासाहेब शिंदे असे दोन शहरप्रमुख अशी रचना आहे . या रचनेत तीन वर्षापूर्वी भाजप मधून शिवसेनेत दाखल झालेले सचिन मोहिते हे उपजिल्हा प्रमुख म्हणून सक्रीय आहेत . सातारा जिल्ह्यात राजकीय बांधणीचा मोठी संधी असताना शहर सेनेत मात्र मनभेद सुरु झाल्याने वादावादीला सुरुवात झाली आहे . सचिन मोहिते यांनी पक्ष विस्ताराच्या नावाखाली मर्जीतले कार्यकर्त्यांचे किचन कॅबिनेट परस्पर सुरु केल्याची तीव्र नाराजी असून निष्ठावान सैनिकांनी आत्महत्या करायच्या का ? अशी तोफ शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी डागली आहे सातारा शहर परिसरातील एका महिलेला मोबाइल देताना फायनान्स कंपनीने गंडविल्याचे सांगत उपजिल्हा प्रमुखांनी अचानक घेतलेल्या पत्रकार परिषदेची तीव्र प्रतिक्रिया आली . योगायोगाने मोबाइल संघटनेचे अध्यक्ष शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरेच असल्याने सेनेच्याच पदाधिकाऱ्यां मध्ये जुंपण्याची वेळ आली होती . सेना पदाधिका ऱ्यांच्या रचनेत शहर संघटक हे पद नवीनच सुरु झाल्याने प्रचंड नाराजी असून संघटकच शहरप्रमुखांना शहरातील आंदोलनाचे निरोप देऊ लागल्याने शहर शिवसेनेने मोहिते कॅबिनेटचा निषेध केला आहे . विद्यमान शहर संघटकांनी पदभार मिळण्या पूर्वीच डबेवाडी येथील बेकायदा उत्खननाचे माहिती अधिकारातील स्वतःच्या लेटरहेडवर पत्र पाठविल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या . निलेश मोरे यांनी . या बाबतची तीव्र नाराजी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्याकडे व्यक्त केली असून प्रसंगी आम्ही पदत्याग करू असा थेट इशारा दिला आहे .

  राजकीय वाटचालीत समज गैरसमज होत असतात . पक्षविस्तार हा आमचा राजकीय अजेंडा असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सेनेचा विचार आम्ही तळागाळापर्यंत पोहचविणार . जी अंतर्गत नाराजी आहे ही वरिष्ठांच्या समक्ष आम्ही चर्चेने सोडवू जिल्ह्यात शिवसेनेत कोठेही गटतट नाही ती एकसंघ आहे . राजकारणात मतभेद असतात पण चर्चेने मार्ग निघू शकतो .

  -सचिन मोहिते , उपजिल्हा प्रमुख, शिवसेना

  “सातारा शहरात आगामी पालिका निवडणुकांच्या हष्टीने शिवसेनेची बांधणी सुरु आहे . उपजिल्हा प्रमुखांनी आम्हा शिवसैनिकांना विश्वासात घ्यायला हवे . परस्पर आंदोलने व पदभरती हा शिवसेनेचा अजेंडा नाही . आम्ही पक्षादेश मानतो ‘ वरिष्ठांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालावे.”

  -निलेश मोरे, सातारा शहरप्रमुख, शिवसेना