नोंदणी व मुद्रांक कार्यालय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना नोंदणी व मुद्रांक कार्यालय कर्मचारी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात एकूण एकवीस मागण्यांचा उल्लेख करण्यात आला असून त्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच , सहा वर्षा पासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित करणे , विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे , विभागातील वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक यांच्या जेष्ठता याद्या सन २०१८ पासून प्रलंबित आहेत.

    खंडाळा : पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे यासह अन्य प्रमुख मागण्यांकरिता नोंदणी व मुद्रांक कार्यालय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

    सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना नोंदणी व मुद्रांक कार्यालय कर्मचारी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात एकूण एकवीस मागण्यांचा उल्लेख करण्यात आला असून त्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच , सहा वर्षा पासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित करणे , विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे , विभागातील वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक यांच्या जेष्ठता याद्या सन २०१८ पासून प्रलंबित आहेत. त्या अंतिम करून तात्काळ प्रसिद्ध करणे, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरणे या अन्य मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे .
    दरम्यान ,प्रभारी दुय्यम निबंधक विशाल साळुंखे यांना पाठींब्याचे पत्र दिले आहे.या बेमुदत संपाला खंडाळ्यातील स्टॅम्प व्हेंडर संघटनेचे अध्यक्ष हिरालाल घाडगे ,उपाध्यक्ष लक्ष्मण कोंडे , सचिव बाळासाहेब राऊत यांनी संघटनेच्यावतीने पाठींबा दर्शविला आहे .