पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू व्यावसायिकाची धमकी

    लोणंद/सुरेश भोईटे : जिंती ता. फलटण येथील पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू उपशाबाबत बातमी का लावली म्हणून एकाने दमदाटी केली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वाळू व्यावसायिक प्रमोद रघुनाथ रणवरे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी जिंती बसस्थानकाजवळ पत्रकार प्रशांत रणवरे हे उभे असताना सायंकाळी गावातीलच वाळू व्यावसायिक प्रमोद रणवरे याने यापूर्वी वाळू व्यावसायबद्दल बातमी का लावली, याचा जाब विचारत चिडून जाऊन शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रमोद रणवरे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार यादव करत आहेत.