कराड अर्बनची सर्वसाधारण ऑनलाईन सभा उद्या

    कराड : दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. कराडची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.२७) ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.

    दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या विविध सभा ऑनलाइन पद्धतीनेच आयोजित केल्या जात आहेत. त्याचप्रकारे शासन आदेशास बांधिल राहून बॅंकेने आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीची बॅंकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन आहे. सदरच्या सभेची नोटीस सर्व सभासदांना यापूर्वी त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहे. सभासदांना बॅंकेच्या १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याचे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सर्व सभासदांना केले आहे.

    यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व संचालक उपस्थित होते. सभेची वरील नमूद लिंक सकाळी १० वापासून कार्यान्वित होणार आहे. लिंकद्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी सभासदांना त्यांना पाठविण्यात आलेल्या  ई-मेल मध्ये नमूद असणारा त्यांचा सभासद क्रमांक, व पासवर्ड टाईप करुन त्यानंतर र्डीलाळीं बटण प्रेस करावे. जेणेकरून लिंक ओपन होऊन ऑनलाइन १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता येईल.