केळघर घाटात बिबट्याचे दर्शन ; नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण

चारचाकी वाहनातून केळघरला येताना एकाला अवघड वळणावर अचानक रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले. त्यावेळी प्रवाश्याने गाडी थांबवून त्याचे व्हिडीओ व फोटो काढले तरी बिबटया शांतपणे रस्ता ओलांडून खालील जंगलात गेल्याची माहिती प्रवाश्याने दिली आहे.

    केळघर: महाबळेश्वरवरून केळघरला येताना एका प्रवाशाला काळाकडा येथे एका वळणावर रात्री ११:३० वाजताचे दरम्यान बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘काळाकडा’ या घाटात रस्त्याचे दुरूस्ती काम चालू असल्याने रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करणे अवघड झाले आहे. अशातच बिबटयासारख्या वन प्राण्याचे दर्शन झाल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे .

    चारचाकी वाहनातून केळघरला येताना एकाला अवघड वळणावर अचानक रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले. त्यावेळी प्रवाश्याने गाडी थांबवून त्याचे व्हिडीओ व फोटो काढले तरी बिबटया शांतपणे रस्ता ओलांडून खालील जंगलात गेल्याची माहिती प्रवाश्याने दिली आहे.
    या रस्त्याने दुचाकीस्वारांना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे . तसेच या परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांनाही धोका आहे. गेल्या वर्षी कुरूळोशी, वरोशी, वाटंबे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले झाले होते. त्यामुळे वनविभागाने त्यांच्या संरक्षित वनक्षेत्रास जाळीदार कुंपण करावे व घाट रस्ता व खाजगी चराऊडोंगर सुरक्षित करावे अशी मागणी या परिसरातील प्रवाशी व गावकऱ्यांकडून केली जात आहे .