हिंदकेसरी संतोषआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू : शिवेंद्रसिंहराजे भोसले

हिंदकेसरी मानाचा किताब सातारा जिल्ह्याला मिळवून देत संतोषआबांनी जिल्ह्याचे नाव देशात केले आहे. याचा आपणास सार्थ अभिमान आहे. लाल मातीच्या सेवेचा तुम्ही घेतलेला वसा आणि वृक्षलागवडीच्या माध्यमातून गावाला हिरवा शालू नेसवण्याचा घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे.

    औंध : हिंदकेसरी मानाचा किताब सातारा जिल्ह्याला मिळवून देत संतोषआबांनी जिल्ह्याचे नाव देशात केले आहे. याचा आपणास सार्थ अभिमान आहे. लाल मातीच्या सेवेचा तुम्ही घेतलेला वसा आणि वृक्षलागवडीच्या माध्यमातून गावाला हिरवा शालू नेसवण्याचा घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे. विधायक कामात निश्चित हिंदकेसरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी दिली.

    सुर्ली ता. कराड येथील हिंदकेसरी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवरूपराजे खर्डेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैया भोसले, वनवासमाचीचे उपसरपंच मनोज माने, युवा नेते अन्सार पटेल, गोविंद क्षीरसागर, पांडुरंग वेताळ,  सतीश वेताळ (फौजी) उपस्थित होते.

    सुर्लीच्या उजाड आणि ओसाड डोंगर हिरवागार करण्यासाठी हिंदकेसरी संतोष वेताळ राबवित असलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. तसेच सैदापूर येथील कुस्तीसंकुलातील मल्लांच्या कामगिरीचा आढावा घेतला. हिंदकेसरी संतोष वेताळ राबवित असलेल्या विधायक कामाबद्दल त्यांनी शाबासकीची थाप मारली. हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सतिश वेताळ यांनी आभार मानले.