महाबळेश्वर गारठले; पारा तीन अंशांपर्यंत खाली

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे थंडीने गारठले आहे. आज महाबळेश्वरचा पारा तीन अंशापर्यंत खाली आला. तर महाबळेश्वरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात पारा हा शून्यावर आला होता.

    महाबळेश्वर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे थंडीने गारठले आहे. आज महाबळेश्वरचा पारा तीन अंशापर्यंत खाली आला. तर महाबळेश्वरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात पारा हा शून्यावर आला होता. पारा घसरल्याने या भागातील दवबिंदू गोठून त्याचे रूपांतर हिमकणात झाले होते.

    पयर्टकांची संख्या रोडावली असली तरी काही स्थानिक नागरिकांनी मात्र या पर्वणीचा आनंद लुटला. महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आली आहे. सर्वत्र पारा घसरला आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी देखील थंडीने गारठले आहे. या थंडीमुळे महाबळेश्वर शहरातील पारा तीन अंशावर खाली आला होता. शहारापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेण्णालेक ते लिंगमळा परीसरात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पारा शहरापेक्षा अधिक खाली आला होता. या ठिकाणी पारा शून्यावर आला होता. पारा चार अंशापेक्षा अधिक खाली घसरला. तर दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु, येथे तर पारा शून्यावर आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठणार असा अंदाज होता. परंतु, आज थंडीबरोबर हवा ही मोठ्या प्रमाणावर वेगाने वाहत होती.

    त्या नेहमीच्या ठिकाणी दवबिंदू कमी प्रमाणात गोठले. या भागातील वाहनांच्या टपावर दवबिंदू गोठलेले पाहावयास मिळाले. काही गवतावर स्ट्रॉबेरीच्या पानांवर दवबिंदू गोठले होते. नेहमी वेण्णालेक येथील बोटक्लबच्या जेटीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठलेले आढळत होते. परंतु आज या ठिकाणी दवबिंदू गोठले नाही.