रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेकडून उद्धवस्त; पक्के ओटेही काढले

धक्कातंत्राचा वापर करून आज पालिकेने रे गार्डन परिसरातील गाळ्यांसमोर करण्यात आलेले ओट्यांचे पक्के बांधकाम जेसीबीच्या मदतीने उध्वस्त केले. पालिकेच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बस स्थानकासमोर पालिकेचे रे गाडर्न शाॅपिंग सेंटर येथे गाळे दुकाने आहेत.

    महाबळेश्वर : धक्कातंत्राचा वापर करून आज पालिकेने रे गार्डन परिसरातील गाळ्यांसमोर करण्यात आलेले ओट्यांचे पक्के बांधकाम जेसीबीच्या मदतीने उध्वस्त केले. पालिकेच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बस स्थानकासमोर पालिकेचे रे गाडर्न शाॅपिंग सेंटर येथे गाळे दुकाने आहेत. यातील काही दुकानदारांनी दुकानांसमोर रस्त्यांवर अतिक्रमण करून पक्के ओटे बांधले होते. या ओट्यांचा अतिक्रमणासाठी हे दुकानदार वापर करीत असत. त्यामुळे दुकानासमोर सहा ते सात फूट अतिक्रमण होत होते.

    या अतिक्रमणाविरोधात अनेक तक्रारी केल्या जात होत्या. पंरतु आजवर राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई केली जात नसे. परंतु पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी मात्र या अतिमक्रणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन ते वारंवार काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, या सूचनांकडे दुकानदारांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आज धक्कातत्रांचा वापर करून पालिकेेच्या मुख्याधिकारी यांनी रे गार्डन अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.

    मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी आदेश देतातच कर निरीक्षक भक्ती जाधव यांनी सुरज किदर्त व अरूण वायदंडे या अधिकाऱ्यांनासोबत घेऊन कारवाईची मोहीम फत्ते केली.