महाबळेश्वर, पांचगणीतील काही पॉईंट सुरू

वेण्णालेक, ऑर्थर्रसीट व टेबललॅण्ड वगळता महाबळेश्वर व पांचगणी येथील उरलेले सर्व पाॅंइंर्ट काही अटी आणि शर्तीवर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी घेतला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी हिरडा विश्रामगृहावर आयोजित केलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली.

    महाबळेश्वर : वेण्णालेक, ऑर्थर्रसीट व टेबललॅण्ड वगळता महाबळेश्वर व पांचगणी येथील उरलेले सर्व पाॅंइंर्ट काही अटी आणि शर्तीवर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी घेतला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी हिरडा विश्रामगृहावर आयोजित केलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली.

    या बैठकीला पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी अरूण मरभळ, पांचगणीचे पोलिस सहा निरीक्षक सतिश पवार महाबळेश्वरचे अब्दुल बिद्रि, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, हाॅटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सयद, दिलीप जव्हेरी, टॅक्सी संघटनेचे अंकुश बावळेकर सी डी बावळेकर घोडा संघटनेचे जावेद खारकंडे सूर्यकांत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    पर्यटकांकडून आरक्षण रद्द

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या िनर्बधांमुळे दोन्ही थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनस्थ्ाळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे पयर्टनावर विपरीत परीणाम झाला होता. पयर्टकांनी आपले आरक्षण रद्द् करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प होवु लागला. ही बाब येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांच्या कानावर घालुन बंद करण्यात आलेले पाॅंइंर्ट सुरू करण्याची मागणी केली. आ मकरंद पाटील व जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिह यांच्या बरोबर चर्चा केली.

    आढाव्यानंतरच नवे आदेश

    कोरोनाबाबतचे नियम हे राज्य शासनाचे असल्याने जिल्हाधिकारी यांनी निर्बंध शिथील करण्यास असमर्थता व्यक्त केली. मकरंद पाटील यांनी मुंबई येथे अतिरीक्त सचिव असिम गुप्ता यांची भेट घेवुन परिरस्ि्थती निदशर्नास आणली. अतिरिक्त सचिव यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना केलेल्या सूचनेनंतर दोन दिवस भेट देवुन गर्दीचा आढावा घेतला व आपला अहवाल पाठविला. त्या ुसार त्यांनी दिलेल्या आदेशा नुसार जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी अधिकारी यांची बैठक घेवुन काही अटी आणि शथीर्वर पाॅंइंर्ट सुरू करण्याचे आदेश दिले.

    नियमांची जबाबदारी सर्वांची

    जिल्हाधिकारी यांनी िदलेल्या आदेशनुसार प्रत्येक पाॅंइंर्टवर पयर्टकांची २५ वाहने जातील. त्यापेक्षा अिधक वाहने प्रवेश हद्दीवर थांबतील. अगोदरची वाहने जाऊन आल्यानंतर पयर्टकांच्या वाहनांना पाॅंईटवर प्रवेश दिला जाईल. या सर्व ठिकाणी कोरोना बाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी प्रशासना बरोबरच येथील स्थानिक नागरीक व व्यवसायिकांवर आहे.