खंडाळा तालुक्यात महाश्रमदान दिन साजरा

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयातील सर्व गावामध्ये विविध उपक्रम दि. २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान सुरु असून संकल्प दिन शपथ घेत खंडाळा तालुक्यात आज महाश्रमदान दिवस पार पडला.

    खंडाळा :स्वच्छता हिच सेवा अभियान अंतर्गत संकल्प दिनाची शपथ घेत खंडाळा तालुक्यात महाश्रमदान दिन विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला.तालुका पंचायत समितीच्या कै. लक्ष्मणराव भरगुडे – पाटील सभागृहात महाआवास योजना व सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार वितरण समारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थित पार पडला.दरम्यान यावेळी संकल्प दिनाची शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, दिपाली साळुंखे,तालुका पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे, अश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, गटविकास अधिकारी अमिता गावडे,विस्तार अधिकारी सनील बोडरे, हृदयनाथ भोईटे, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे गट समन्वयकअतुल गायकवाड,सीमा गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

    स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयातील सर्व गावामध्ये विविध उपक्रम दि. २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान सुरु असून संकल्प दिन शपथ घेत खंडाळा तालुक्यात आज महाश्रमदान दिवस पार पडला.त्यामध्ये गावात साफ सफाई करणे, कचरा संकलन व वर्गीकरण करणे, कचरा उचित व्यवस्थापन करणे, पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या ठिकाण स्वच्छता करणे,शोषखड्डा निर्मीती, स्वच्छता विषयक घोषवाक्य भिंतीवर लिखान करणे, सार्वजनिक ठिकाणचे भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणे व जनजागृती करणे. आदी उपक्रमाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.