मलकापूर नगरपालिका कोरोना लसीकरणात आघाडीवर; मिळतोय मोठा प्रतिसाद

मलकापूर शहरात पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथील कोविड परिस्थिती आवाक्यात आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाला मलकापर वासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

    कराड : मलकापूर शहरात पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथील कोविड परिस्थिती आवाक्यात आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाला मलकापर वासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भारती विद्यापीठाच्या इमारतीमध्येे काले आरोग्य केंद्र व मलकापूर नगरपालिकेच्या वतीने लसीकरण मोहिम सुरू आहे. आतापर्यंत मलकापूर शहरात 70% हून अधिक लसीकरण झाले आहे. शंभर टक्के लसीकरणासाठी पूर्णत्वास नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

    सातारा जिल्ह्याकरिता मोठ्या प्रमाणावर लसीचे ढोस उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागात ऑनलाइन तर ग्रामीण भागात प्रत्यक्ष लसीकरण लस उपलब्ध करण्यात आली आहे. अनेक लाभार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रिया अडचणीचे होत असल्याने नगरपालिका कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्या मदतीने लसीकरण केंद्रावर नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे.

    येथील लसीकरण मोहिमेत काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री देसाई, केंद्र नोडल अधिकारी ज्ञानदेव साळुंखे, नोडल अधिकारी पांडुरंग बोरगे, रामचंद्र शिंदे आरोग्यसेविका पावणे, पर्यवेक्षक राजू पटेल, आरोग्य सेवक गणेश काळे, शिपाई रामदास तडाखे व आशा सेविका व कर्मर्‍यांनी सहभाग घेतला आहे.