
मुळचा माण तालुक्यातील असणारा पाच वर्षीय बालक गेले काही वर्षे आपल्या आई-वडिलांसह सातारा तालुक्यातील एका गावात भाड्यानं दोन खोल्या घेऊन राहण्यास होता. काल त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी त्याचे वडील कामावरुन परतले. यावेळी त्यांना पाच वर्षीय मुलगा घरातल्या पुढच्या खोलीत दिसला नाही. त्यांनी शोध घेतला, मात्र तो कोठेही आढळला नाही.
सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पाच वर्षीय बालकाचा मृतदेह काल रात्री राहत्या घरातील स्वयंपाक घरात आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर, सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत १६ वर्षीय अल्पवयीनास संशयावरुन ताब्यात घेतलंय. त्या अल्पवयीनानं धारदार शस्त्रानं वार करत त्या पाच वर्षीय बालकाचा खू्न केल्याची कबुली दिली असून हा प्रकार लैगिंक अत्याचारातून घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मुळचा माण तालुक्यातील असणारा पाच वर्षीय बालक गेले काही वर्षे आपल्या आई-वडिलांसह सातारा तालुक्यातील एका गावात भाड्यानं दोन खोल्या घेऊन राहण्यास होता. काल त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी त्याचे वडील कामावरुन परतले. यावेळी त्यांना पाच वर्षीय मुलगा घरातल्या पुढच्या खोलीत दिसला नाही. त्यांनी शोध घेतला, मात्र तो कोठेही आढळला नाही. यानंतर ते स्वयंपाक घरात गेले असता, त्यांना आतील स्वयंपाक खोलीत रक्तानं माखलेला मुलगा आढळला. त्यांनी त्यास उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळं त्यांनी इतरांना मदतीसाठी बोलावत बेशुध्दावस्थेत असणाऱ्या पाच वर्षीय मुलास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती पाच वर्षीय त्या बालकास मृत घोषित करण्यात आले.
सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे तपास करून तातडीने या प्रकरणी अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले . या खूनं प्रकरणासह झालेल्या या तपासाची माहिती पोलीस अधीक्षक अजयंकुमार बंन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली . लहानग्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला . या बालकाचा रक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याची पोलीस सूत्रांनी पुष्टी केली . या प्रकाराने सातारा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . या बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे .