काँग्रेस भवन येथे दीपक मोतलिंग यांचा प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या हस्ते सत्कार

देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस सेवक व सातारचे सुपुत्र दिपक मोतलिंग यांचा ही सत्कार करण्यात आला. गेली ३५ वर्षे ते काँग्रेस भवन येथे सेवा बजावत आहे, सातारा जिल्ह्यातील कळंबे ता वाई गावचे मोतलिंग हे नोकरीच्या शोधात मुंबईला आले.

    सातारा : देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस सेवक व सातारचे सुपुत्र दीपक मोतलिंग यांचा ही सत्कार करण्यात आला. गेली ३५ वर्षे ते काँग्रेस भवन येथे सेवा बजावत आहे. सातारा जिल्ह्यातील कळंबे ता. वाई गावचे मोतलिंग हे नोकरीच्या शोधात मुंबईला आले.

    बावधन ता. वाई गावचे सुपुत्र व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. एम. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मंत्रालयासमोरील काँग्रेस भवन येथे पस्तीस वर्षांपूर्वी आपल्या सेवेचा प्रारंभ केला होता. काँग्रेसचा वैभवशाली काळ त्यांनी अनुभवला आहे, अनेक कार्यकर्ते व नेते घडले, त्यांचा ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांना माहित आहे. पोस्ट, एम. टी. एन. एल. व हिंदुस्थान लिव्हर कंपनी च्या कामाचा अनुभव घेऊन त्यांनी काँग्रेस भवनची निवड केली. ती सार्थक झाली आहे.

    काँग्रेस स्थापना दिवशीच दिपक मोतलिंग यांचा ही वाढदिवस काँग्रेस भवनमध्ये साजरा केला जातो. हा निव्वळ योगायोग आहे. साडेतीनशे रुपये वेतनापासून काँग्रेस भवनमध्ये कार्यरत राहणाऱ्या मोतलिंग यांची मुले ही नोकरी-व्यवसायात यशस्वी झाली आहेत. ही सर्व काँग्रेस पक्षाची देणं आहे असे ते प्रामाणिकपणे सांगत आहेत. दररोज सकाळी बदलापूर ते व्ही. टी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असा नियमितपणे प्रवास करीत आहेत. मंत्रालयासमोरील काँग्रेस भवनचे कार्यालय स्थलांतर झाले आहे. सध्या त्याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे.

    काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या वर्धापनदिनानिमित काँग्रेस भवन मध्ये कार्यक्रम झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसिम खान, विशाल मोटेमवार व मान्यवरांच्या हस्ते काँग्रेस सेवक व सातारा जिल्ह्यातील सुपुत्र दिपक मोतलिंग यांचा सत्कार करण्यात आला. सध्या रिगल समोरील काँग्रेस कार्यालय, दादर येथील गांधी भवन येथून ही पक्षाचे काम चालते. त्याठिकाणी ही जावे लागते अशी माहिती देण्यात आली.

    दीपक मोतलिंग यांच्या या कार्याला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, सातारा जिल्ह्यातील नेते डॉ. सुरेश जाधव, युवा नेते रणजितसिंह देशमुख, बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार,नरेश देसाई,रजनी पवार,डॉ महेश गुरव व मान्यवरांनी ही शुभेच्छा दिल्या आहेत.