साताऱ्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण; पालिकेची आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत सहा रुग्ण आढळून आले असून ते फलटण तालुक्यातील आहेत. आरोग्य यंत्रणेच्या हवाल्या नुसार या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सातारा शहरात वास्तव्य करणाऱ्या एका युवतीला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. हा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला.

    सातारा : संपूर्ण जगाची झोप उडविणाऱ्या ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सातारा शहरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . सातारा पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संबधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    जिल्ह्यात आजपर्यंत सहा रुग्ण

    सातारा जिल्ह्यात आजपर्यंत सहा रुग्ण आढळून आले असून ते फलटण तालुक्यातील आहेत. आरोग्य यंत्रणेच्या हवाल्या नुसार या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सातारा शहरात वास्तव्य करणाऱ्या एका युवतीला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. हा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला.

    अमेरिकेवरून साताऱ्यात

    आरोग्य यंत्रणेच्या हवाल्यानुसार ही युवती आठ दिवसापूर्वी अमेरिकेवरून साताऱ्यात पोहोचली. या युवतीच्या घशाचे स्त्राव दिनांक २३ तारखेला घेण्यात आले होते. मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने या युवतीसह तिच्या संपर्कातील असणाऱ्यांची माहिती घेऊन तत्काळ तपासणी सत्र सुरु केले आहे.  युवतीची प्रकृती स्थिर अपल्याची माहिती कोविड कक्ष संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.