सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव ; फलटणचे तिघे संशयित बाधित

सदर चारही व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. निकट सहवासितांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जनतेने ओमिक्रोनची भिती बाळगू नये. तथापि कोव्हीड १९ संबंधित सर्व नियमांचे व सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे. सर्वांनी कोव्हीड १९ चे प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केलेले आहे.

    फलटण : युगांडा येथून एकाच कुटूंबातील चार व्यक्ती दि. ०९ डिसेंबर रोजी फलटण येथील लक्ष्मीनगर येथे आलेल्या होत्या. सदर व्यक्ती आल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत त्यांची कोरोना रॅपिड तपासणी व कोरोना आरटीपीसीआर तपासणी हि दि. ९ डिसेंबर रोजी करण्यात आल्या. सदर तपासणी मध्ये तीन जणांची कोव्हीड टेस्ट पॉझीटिव्ह आली व एका व्यक्तिची टेस्ट निगेटिव्ह आली होती. इतरांची लॅब मार्फत पुणे येथे पाठविणेत आले असता सदर तपासणीचा अहवाल आज दि. १८ डिसेंबर रोजी प्राप्त झालेला आहे. त्यामधून तिघांना ओमिक्रोनची बाधा झालेचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली. यासोबतच चौथ्या रुग्णाची कोव्हीड १९ तपासणी अहवाल पोॉझीटिव्ह आला असून सदर कुटूंबाचे दि. १३ डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे विशेष कक्षामध्ये विलगीकरण करणेत आलेले आहे. सदर चारही व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. निकट सहवासितांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जनतेने ओमिक्रोनची भिती बाळगू नये. तथापि कोव्हीड १९ संबंधित सर्व नियमांचे व सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे. सर्वांनी कोव्हीड १९ चे प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केलेले आहे. तसेच परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांनी होम क्वारंटाईन होऊन कोव्हीड १९ ची तपाणी करुन घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा यावेळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.