कृष्णा फाउंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा शंभर टक्के निकाल; सिमरन मुल्ला अव्वल

वाठार, ता. कराड येथील कृष्णा फाउंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे.

    कराड : वाठार, ता. कराड येथील कृष्णा फाउंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा पहिल्या बॅचचा निकाल (Pharmacy Result) शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. यात रेठरे खुर्दच्या सिमरन मुल्ला (Simran Mulla) या विद्यार्थीनीने 93.40 टक्के गुण मिळवत अव्वल स्थानावर बाजी मारली आहे.

    महाराष्ट्र राज्यबोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्च्या डी फार्मचा अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात रेठरे खुर्दच्या सिमरन मुल्ला या विद्यार्थीनीने (93.40%), व्दितीय क्रमांक सिध्दनाथ नलवडे (92.90%), तृतीय क्रमांक ऋषीकेश लोहार (91.10%) तर वसुंधरा पवार (90.70), कृती मेहता (89.80%) टक्के गुण मिळवले आहेत.

    या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भेसले, विश्वस्त डॉ. अतुल भोसले, विनायक भोसल, संचालक डॉ. विनोद बाबर, प्राचार्य चेतना पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.