फलटण येथे बेदम मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

गल्लीतील मुलीच्या छेडछाडीवरुन येथील कुंभारगल्लीतील पाच ते सहा जणांनी फलटणमधील दोघांना तलवार लोखंडी पाईप लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. 

    सातारा : गल्लीतील मुलीच्या छेडछाडीवरुन येथील कुंभारगल्लीतील पाच ते सहा जणांनी फलटणमधील दोघांना तलवार लोखंडी पाईप लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. एकाचा दवाखान्यात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर दुसरा बारामती येथील दवाखान्यात उपचार घेत आहे. शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, 12 डिसेंबरला दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास निलेश हिरालाल चव्हाण व त्याचा मित्र भरत फडतरे या दोघांना सलीम शेख, सैफुला सलीम शेख, जमीर सलीम शेख, (सर्व रा. कुंभारटेक फलटण) बिलाल (संपूर्ण नांव माहित नाही), राज बागवान व अन्य अनोळखी इसम अशा पाच ते सहा जणांनी तलवार, लोखंडी पाईप, लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली झालेल्या मारहाणीत निलेश चव्हाण व भरत फडतरे गंभीर जखमी झाले होते. पैकी चव्हाण यास येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरानी सांगितले तर दुसरा इसम फडतरे यास बारामती येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे

    या घटनेची फिर्याद कांता हिरालाल चव्हाण (वय 55 रा. कसबा पेठ फलटण) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी संशयित पाच जणाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भारत किन्द्रs करीत आहेत.