पाटण नगरपंचायत निवडणूक ४१ उमेदवार रिंगणात, बहुरंगी लढत

निवडणुकीत ११ ठिकाणी सरळ तर २ ठिकाणी अंतर्गत लढत होत आहे. काही ठिकाणी थेट, काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष (पाटणकर गट), शिवसेना, भाजप व काँग्रेस अशा लढती होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपंचायतीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ३, ८, १० व १३ या ४ प्रभागातील निवडणुकींना स्थगिती देण्यात आल्याने उर्वरित १३ प्रभागासाठी निवडणूक प्रकिया होत आहे.

  पाटण : पाटण नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १०६ अर्जापैकी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले असून ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी दि. २१ रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील गाडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.

  दरम्यान, या निवडणुकीत ११ ठिकाणी सरळ तर २ ठिकाणी अंतर्गत लढत होत आहे. काही ठिकाणी थेट, काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष (पाटणकर गट), शिवसेना, भाजप व काँग्रेस अशा लढती होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपंचायतीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ३, ८, १० व १३ या ४ प्रभागातील निवडणुकींना स्थगिती देण्यात आल्याने उर्वरित १३ प्रभागासाठी निवडणूक प्रकिया होत आहे. यामध्ये ओबीसी २६ अर्ज वगळता ११५ अर्जाची छाननी होऊन १०६ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले होते.

  अशा होणार लढती…..
  प्रभाग क्र. – १, (अनुसूचित जाती)-
  १) स्वप्नील प्रल्हाद माने- (पाटणकर गट)
  २) तुषार चंद्रकांत कांबळे – (भाजप)
  ३) गणेश रामचंद्र भिसे – (शिवसेना)
  प्रभाग क्र. – २ (सर्वसाधारण महिला) –
  १) सविता राजेंद्र उर्फ गणेश मोरे- (पाटणकर गट)
  २) सुषमा गणेश मोरे – (पाटणकर गट)
  ३) विद्या योगेश वायदंडे – (शिवसेना)
  ४) वैशाली राजू देवकांत – (भाजप)
  प्रभाग क्र. – ४ (सर्वसाधारण)-
  १) संजय जयवंत चव्हाण – (पाटणकर गट)
  २) राजेंद्र शिवदास राऊत – (पाटणकर गट)
  ३) शंकर कृष्णा कुंभार – (शिवसेना)
  प्रभाग क्र. – ५ (सर्वसाधारण महिला)
  १) सुभद्रा आनंदराव देशमुख – (पाटणकर गट)
  २) संजना संजय जवारी – (पाटणकर गट)
  ३) साधना रविकांत फुटाणे – (भाजपा)
  ४) सोनाली अमरजीत पवार – (शिवसेना)
  प्रभाग क्र. – ६ (सर्वसाधारण)
  १) सागर दादासो पोतदार – (पाटणकर गट)
  २) विरेंद्र गणपती खैरमोडे – (पाटणकर गट)
  ३) नानासाहेब शंकर पवार – (शिवसेना)
  प्रभाग क्र. – ७ (सर्वसाधारण महिला)
  १) सोनम जयदीप फुटाणे – (पाटणकर गट)
  २) जयश्री संजय शिंदे – (शिवसेना)
  प्रभाग क्र. – ९ (अनुसुचित जमाती)
  १) संतोष चंद्रकांत पवार – (पाटणकर गट)
  २) संतोष शंकर पवार – (शिवसेना)
  प्रभाग क्र.- ११ (सर्वसाधारण)
  १) सचिन किसनराव कुंभार – (पाटणकर गट)
  २) राहुल अशोक देवकांत – (शिवसेना)
  ३) दर्शन संजय कवर –
  (राष्ट्रीय काँग्रेस)
  ४) रंजित गोपाळसिंग भाटी – (भाजपा)
  प्रभाग क्र.- १२ (अनुसुचित जाती महिला)
  १) अनिता शशिकांत देवकांत – (पाटणकर गट)
  २) पूनम वैभव घोणे – (शिवसेना)
  ३) गौरी जितेंद्र सूर्यवंशी – (अपक्ष)
  ४) श्वेता राजू देवकांत – (राष्ट्रीय काँग्रेस)
  प्रभाग क्र.- १४ (सर्वसाधारण महिला) –
  १) आस्मा सादिक इनामदार – (शिवसेना)
  २) शबाना इम्रान मुकादम – (पाटणकर गट)
  ३) हिराबाई मारुती कदम – (भाजप)
  ४) श्रद्धा संजय कवर –
  (राष्ट्रीय काँग्रेस)
  प्रभाग क्र. – १५ (सर्वसाधारण महिला)
  १) शैलजा मिलींद पाटील – (शिवसेना)
  २) वैशाली सुनील पवार – (पाटणकर गट)
  ३) अश्विनी प्रदीप शेलार –
  (राष्ट्रीय काँग्रेस)
  प्रभाग क्र.- १६ (अनुसुचित जाती महिला)
  १) मंगल शंकर कांबळे – (पाटणकर गट)
  २) प्रणिता संतोष कांबळे – (शिवसेना)
  प्रभाग क्र. १७ (सर्वसाधारण)
  १) उमेश वसंतराव टोळे – (पाटणकर गट)
  २) चंद्रकांत शंकर चौधरी – (शिवसेना)
  ३) दर्शन संजय कवर – (राष्ट्रीय काँग्रेस)
  निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी, मतदान व मतमोजणी पर्यंत नागरिकांनी शांतता बाळगावी, कोणताही अनुचित प्रकार करू नये, असे आवाहन केले आहे.