कृत्रिम नेत्यांपासून जनतेने सावध राहावे : मानसिंगराव जगदाळे

जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासकामांची पूर्तता होत आहेत. परंतु, फक्त निवडणूक आली की पाच वर्षानंतर गावागावात जाऊन कोणताही विकास न करता केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे कार्यक्रम आता सुरु होतील. अशा कृत्रिम नेत्यांपासून जनतेने सावध राहून विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहावे.

    मसूर : मसूर भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासकामांची पूर्तता होत आहेत. परंतु, फक्त निवडणूक आली की पाच वर्षानंतर गावागावात जाऊन कोणताही विकास न करता केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे कार्यक्रम आता सुरु होतील. अशा कृत्रिम नेत्यांपासून जनतेने सावध राहून विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहावे, असे आव्हान जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले.

    पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा विशेष फंड आणि जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी जगदाळे बोलत होते. यावेळी अशोक संकपाळ, प. स. सदस्य रमेश चव्हाण, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, हणबरवाडीचे सरपंच प्रकाश कुंभार, विस्ताराधिकारी आनंद पळसे, हेळगावच्या सरपंच जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी माळवाडीचे उपसरपंच गणेश मांडवे, ग्राम विकास अधिकारी विकास स्वामी या मान्यवरांसह दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, दिलीपराव लंगडे, रमेश जाधव, अक्षय कोरे, कैलास कांबळे, देविदास माळी, महेश घाटगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

    या कामांचा झाला शुभारंभ

    गायकवाडवाडी येथील बिरोबा मंदिर सभामंडप, गायकवाडवाडी ते पाडळी रस्ता डांबरीकरण, हणबरवाडी येथे प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंत, माळवाडी ते यादववाडी रस्त्याचे डांबरीकरण, ब्रह्मपुरी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण, मातंग वस्तीमध्ये लक्ष्मी मंदिर ते गावविहीरपर्यंत काँक्रीट गटर्स.