फलटण भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये दरमहा हप्ता गोळा करण्याचे काम निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वांझे यांच्यावर सोपवल्याची खळबळजनक आरोप मुंबई पोलीस आयुक्त मा. परमवीर सिंग यांनी केले आहेत. ही बाब गंभीर असून महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असून मा मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा तत्पर घ्यावा व त्याची एन आय ए मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

    फलटण : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील आणि विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सुचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे , शहराध्यक्ष अमोल सस्ते, गटनेते अशोकराव जाधव ,बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणचे तहसिलदार समीर यादव यांना निवेदन देण्यात आले ..महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे , धनंजय पवार, सुनील जाधव, तानाजी करळे, सौ मुक्ती शहा, सौ उषा राऊत, नितिन वाघ, बंडु मदने, सुखदेव खटके, शशिकांत रणवरे , राहुल शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनावेळी उपस्थित होते.

    प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये दरमहा हप्ता गोळा करण्याचे काम निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वांझे यांच्यावर सोपवल्याची खळबळजनक आरोप मुंबई पोलीस आयुक्त मा. परमवीर सिंग यांनी केले आहेत. ही बाब गंभीर असून महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असून मा मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा तत्पर घ्यावा व त्याची एन आय ए मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच हे महाविकास आघाडी सरकार राज्यपाल महोदयांनी बरखास्त करावे यासाठी शिफारस करावी कारण या सरकारने जनतेच्या हिताचे एकी ही चांगले काम केले नाही आज गोरं गरीब , मजुर , कष्टकरी शेतकरी याची लाईट बिल हे सरकार तोडत आहे, आज कोरोणा चे परिस्थिती हातळणेस सरकार अपयशी ठरले आहे तसेच अनेक मंत्र्यांच्या वर भ्रष्टाचाराचे बलात्काराचे आरोप झालेले आहेत तरी असे सरकार जनतेच्या हिताची कामे करू शकत नाही ..तर आंदोलनवेळी महाविकास आघाडी चा धिक्कार असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.,या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या