विलासपूरमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण

    सातारा : विलासपूर आणि परिसरातील नागरिकांची कोविड १९ लसीकरणासाठी होणारी परवड पाहून सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली विलासपूरमधील ज्येष्ठ पारेख काका युवा कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर, फिरोज पठाण, आशुतोष चव्हाण, अभयराज जगताप या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे विलासपूर आणि परिसरातील नागरिकांसाठी दुसऱ्यांदा विशेष लसीकरण शिबिराचे विलासपूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.

    सातारा जिल्हा परिषद आणि जिव्हिका हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वर्षांवरील नागरिकांना १५० कोव्हिशिल्ड लसीचे डोस यावेळी देण्यात आले. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना या लसीकरणाचा लाभ घेता आला. यासाठी जिल्हा परिषदेचे डॉक्टर शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. पवार, मेडिकल ऑफिसर डॉ. गोखले यांच्या बहुमोल सहकार्याने जिव्हिका हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. वीणा काकडे, विशाल सिंह, इर्शाद तांबोळी, सुरज माने, वैद्यकीय सहाय्यक रसिका मयुरी, अंगणवाडी सेविका वैशाली म्हस्के आदींनी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यासाठी परिश्रम घेतले.

    फाउंडेशनच्या वतीने अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्बुलन्सही तैनात ठेवण्यात आली होती. लस घेतलेल्या नागरिकांनी या शिबिराबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी डेस्कवर लसीकरण केलेला आपला फोटो काढत होते. यावेळी लसीकरण सुसह्य आणि शांततेत होण्यासाठी शिवेंद्रराजे मित्र मंडळाचे निरंजन कदम, प्रकाश पाटील, युवराज जाधव, रवी पवार, संकेत जगताप, सामाजिक कार्यकर्ते विजय देवकर, राजेंद्र चव्हाण, उदय मराठे, मिनिश सावंत, गिरिष सोनार, आसिफभाई शेख, राजू नलावडे इत्यादी तरुण प्रयत्न करत होते.

    शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाचे वतीने चहा आणि नाष्टाची यावेळी सोय करण्यात आली होती. तसेच या परिसरातील ४५ वर्षांवरील बहुतांश लोकांचे लसीकरण झाले असल्याने आता शासनाने १८ वर्षांपुढील लोकांना लसीकरण करण्यासाठी मान्यता मिळाल्यानंतर लगेचच १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी विशेष लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती युवा कार्यकर्ते बाळासाहेब महामूलकर यांनी दिली.