वेळे येथे महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण

    वाई : दरवर्षी ग्रामपंचायत वेळे येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या गावात वृक्षारोपण करत असते. यावर्षीही माजी जि. प. सदस्य शशिकांत पवार यांनी त्यांच्या शेतात तयार केलेली वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली.

    शशिकांत पवार यांनी वृक्षारोपनाचा छंद जोपासला आहे. ते दरवर्षी पुढाकार घेऊन आपल्या गावच्या परिसरात झाडे लावतात. त्यात वडाच्या झाडाची प्रामुख्याने लागवड करतात. कारण नैसर्गिकरित्या ऑक्सिजन या झाडापासून मिळतो व हे वृक्ष १०० वर्षांपेक्षा जास्त टिकतात. त्याचे यश म्हणून त्यातील बरीच वडाची झाडे आज वेळे परिसरात जोमाने उभी आहेत. त्याबद्दल नानांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत.

    आज वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान शशिकांत पवार, माऊली पतसंस्थेचे चेअरमन दिलीप ननावरे, सरपंच रफिक इनामदार, उपसरपंच संतोष नलावडे, ग्रामसेवक हिंदुराव डेरे, ग्रामपंचायत सदस्या शितल पवार, स्वप्ना पवार, पोलीस पाटील तनुजा पवार, सामाजिक कार्यकर्ते हणमंत पवार गुरुजी, संजय पवार, अष्टविनायक ग्रुपचे अध्यक्ष संदीप पवार, प्रकाश पवार, वसंत नलावडे, ग्रामपंचायत वेळेचे सर्व कर्मचारी व वेळे गावातील महिला उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वटपौर्णिमीचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.