प्रभाकर देशमुखच जनतेच्या मनातील आमदार : रोहित पवार

माण खटावला आजही जनतेच्या मनातील आमदार म्हणून प्रभाकर देशमुख हेच आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

    वडूज : माण खटावच्या जनतेला पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाठपुरावा करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची खरी तळमळ प्रभाकर देशमुख यांच्या ठिकाणी असून, माण खटावला आजही जनतेच्या मनातील आमदार म्हणून प्रभाकर देशमुख हेच आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

    माण खटावचे नेतृत्व अतिशय प्रामाणिकपणे करून येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने आपली ताकद प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी उभी करून विकासाचे काम पुढे न्यावे. एक प्रशासनातील अनुभवी व्यक्ती आणि आपल्या गावासोबत, मातीसोबत कधीही नाळ तुटणार नाही यासाठी माण खटावच्या दुष्काळी भागातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा देत प्रत्यक्ष कामांच्या पूर्ततेसाठी लक्ष देण्याची त्यांची भूमिका आहे. माण खटावला न्याय देण्यासाठी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मिळेल असा मला विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

    उरमोडी व तारळी योजनेच्या पाण्याचे जलपूजन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभय जगताप, भोजलींग पाणी संघर्ष समितीचे सर्व सदस्य आणि या पाणी योजनेमुळे सुखवलेले पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.