केंद्र सरकार जनगणना करणार नसल्याने वंचितकडून जाहीर निषेध : रेखा ठाकूर

    सातारा : बहुजनाविरोधी सातत्याने केंद्र सरकार विरोधी भूमिका घेत आहे. आता तर जनगणना होणार नाही, असे केंद्र सरकार म्हणत असल्याने वंचित जाहीर निषेध करीत आहे, असे प्रतिपादन राज्याध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केले.

    येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात वंचितचा संवाद समीक्षा मेळाव्यात रेखा ठाकूर मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी चंद्रकांत खंडाईत, राजेंद्र फडतरे, निर्मला विलास वनशिव, बाळासाहेब कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.

    रेखा ठाकूर म्हणाल्या, संविधान विरोधी कृत्य भाजपा वारंवार करीत आहे. राजकीय, प्रशासकीय यंत्रणा उघडउघड विरोध करणारे सरकार राज्य व केंद्रात आहे. फक्त रस्त्यावर ओबीसी/इतरांचा कळवळा म्हणून भाजपा रस्त्यावर उतरत आहे. मग जनगणना का होऊ देत नाही? असा खडा सवालही ठाकूर यांनी केला. नुसती नाटकं करू नका. प्रभाग रचनेबाबतही ठाकूर यांनी हल्लाबोल केला. एक मत, एक मूल्य असे संविधानाने दिले असताना छेद महाआघाडी का करीत आहे. ही सर्व व्यूवहरचना वंचितला बाद करण्यासाठीच प्रभाग रचना करीत आहेत.

    याबाबत कोर्टात आव्हान द्यावे लागणार आहे. जी जबाबदारी पदाधिकारी यांच्यावर दिली आहे. ती काटेकोरपणे पार पाडावी. पदाधिकारी म्हणून आपल्या अखत्यारीत काम करावे लागणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बहुजनांची सत्ता येईल, असे म्हटले होते. मात्र, प्रस्थापितच राज करताना आढळून येत आहे. ४३ लाख मतदान वंचितला झाले होते. अजून २० लाखापर्यंत मतदान वाढले तर नक्कीच सत्तेत वाटा मिळेल. फक्त इमले बांधू नका. तर संघटीत राहून यश खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.