
वडूज : खटाव तालुक्याच्या राजकारणात सुमारे पाच वर्षांपूर्वी सक्रिय होऊन औंध जिल्हा परिषद गणातून तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पंचायत समिती सभापतिपदी निवड झाली. फक्त एक ते सव्वा वर्ष या सभापतिपदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या संधीचा फायदा उठवून आपल्या सामाजिक कामाची एक आदर्श झलक दाखवून जनतेच्या मनात एक वेगळं स्थान व आपुलकी निर्माण करणारे संदीप उर्फ पिंटू पैलवान हे खऱ्या अर्थाने तालुक्यातील खंबीर युवा नेतृत्व असल्याचं मत माजी विभागीय आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
खटाव पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संदीप मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात देशमुख बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुनराव खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे, नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सी. एम. पाटील, रासपयुवक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर, शेतकरी संघटनेचे अनिल पवार, बाळासाहेब पोळ, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दै. ‘नवराष्ट्र’च्या विशेष अंकाचं प्रकाशन संदीप मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी येरळा समूहाचे धनंजय क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड मर्चंट बँकेचे चेअरमन सुरेश बापू पवार, गुरसाळे सरपंच हसन शिकलगार, उपसरपंच ऍड रोहन जाधव, कुमठे नागाचे सरपंच प्रतिनिधी रमेश गलंडे उपसरपंच दत्तात्रय मांडवे, सदस्य रणजित फडतरे, दरजाई सरपंच संतोष बोटे पाटील, युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे योगीराज रणनवरे, उंबर्डे सरपंच प्रतिनिधी संजय पवार, उपसरपंच संभाजी पवार, येरळवाडी सरपंच योगेश जाधव, माजी सरपंच सदाशिवराव बागल, ११ गाव पाणी संघर्ष समितीचे समन्वयक अशोक देशमुख, शशिकांत देशमुख, राजेंद्र देशमुख, अमीन आगा, पाटेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध गावातील संदीप मांडवे यांचे हितचिंतक आदींची उपस्थिती होती.
दै. नवभारत ग्रुपच्या दै. नवराष्ट्र या सर्व समावेशक वृत्तपत्राने अल्पवधीतच वाचकांच्या मनावर मजबूत पकड घेतली असून, अत्यंत वाचनीय असा हा अंक आहे.
– प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त
दै. नवराष्ट्रचा मी नियमित वाचक असून माझ्या वाढदिवसाचा विशेषांक अतिशय दर्जेदार मांडणी व आकर्षक रुपात बघायला मिळाला, एवढ्या व्यस्त कार्यक्रमात देखील हा अंक वाचण्याचा मोह आवरता आला नाही.
– संदीप मांडवे, माजी सभापती