‘पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य’कडून प्रणाली कदम यांना गुणगौरव पुरस्कार

कोरोना काळात वाई तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये मास्क वाटप तसेच सॅनिटायझर फवारणी वेळोवेळी पोलीस बांधवांना मदत करण्याची तयारी प्रणाली कदम यांनी दाखवली. तसेच त्या स्वतः पत्रकार असल्याने समाजात अनेक विषयांच्या वर त्यांनी लिखाण देखील केले आहे.

    लोणंद : प्रणाली कदम यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार सोहळा २०२१ रुपाली चाकणकर अध्यक्ष – राज्य महिला आयोग महाराष्ट्र यांच्या हस्ते युवती गुणगौरव पुरस्कार प्रणाली तानाजी कदम यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात वाई तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये मास्क वाटप तसेच सॅनिटायझर फवारणी वेळोवेळी पोलीस बांधवांना मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. तसेच त्या स्वतः पत्रकार असल्याने समाजात अनेक विषयांच्या वर त्यांनी लिखाण देखील केले आहे.

    वाई तालुक्यातील अनेक समाजरत्न लोकांना कोविड योद्धा पुरस्कार देखील त्यांनी पोलीस मित्र समिती कडून त्यांनी दिला. त्या स्वतः एका वृत्तवाहिनीच्या संपादिका देखील आहेत.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कु प्रणाली कदम यांना देण्यात आला.तसेच अनेक तालुक्यातून व जिल्ह्यातून पोलीस मित्र समिती साठी चांगेल काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना असे पुरस्कार देण्यात आले आहेत.प्रणाली कदम यांच्यावर सामाजिक शैक्षणिक राजकीय कृषि विविध क्षेत्रांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.