Big blow to NCP leader Shashikant Shinde in Satara; Shiv Sena in the lead

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर रांजणे यांनी शिंदे यांना पराभूत केले. या पराभवानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात शिंदे समर्थकांनी घोषणाबाजीही केली. यानंतर शिंदे यांनी जाहीर माफी मागीतली(Satara: After the defeat, Shashikant Shinde publicly apologized to Sharad Pawar).

    सातारा : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर रांजणे यांनी शिंदे यांना पराभूत केले. या पराभवानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात शिंदे समर्थकांनी घोषणाबाजीही केली. यानंतर शिंदे यांनी जाहीर माफी मागीतली(Satara: After the defeat, Shashikant Shinde publicly apologized to Sharad Pawar).

    ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभे केले, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन असे शशिकांत शिंदे म्हणाले.