Bribe

माणुसकीची गरज असतानाही कोरोना संकटातही सराईत लाच खोरांनी कार्यभार उरकला होता. यामध्ये महसूल,शिक्षण, वन,पोलीस,पालिका व  वीज मंडळाचा चांगलाच प्रकाश पडला आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, खटाव तालुक्यातील लाचखोरांनी चांगलाच हात मारला आहे. भक्कम पुरावे सादर करूनही कायदेशीर पळवाट सापडत असल्याने वडूज मधील लाच लुचपत विभागाची धाड चांगलीच चर्चेत आली आहे.

    अजित जगताप, सातारा :  शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेणे-देणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण,खुलेआम गुन्हा करूनही सातारा जिल्ह्यात दिडशे जणांवर ठोस कारवाई न केल्याने लाच लुचपतची धाड जिल्हयात लाचखोरांसाठी ‘सेफ’ झोन ठरू पहात आहे.अशी चर्चा सुरू झाली आहे.

    छत्रपती शिवरायांची राजधानी व संविधान निर्माती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी प्राथमिक शालेय शिक्षण घेतले.त्याच सातारा जिल्ह्यात लाच लुचपत विभागविरोधी एका प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. ही सुध्दा राज्यात पाहिली वेळ ठरली आहे.मागील चार वर्षात शासकीय-निमशासकीय सेवेतील १५७ जणांवर सातारा लाचलुचपत विभागाने भ्रष्ट शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पण, दोन गरीब व सामान्य वगळता सर्वजण पुन्हा दिमाखात शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या काहींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सातारा जिल्ह्यातील काही ‘टोळके’ व त्यांची तळी उचलणारे ‘भामटे’ यांची ही यानिमित्त सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

    माणुसकीची गरज असतानाही कोरोना संकटातही सराईत लाच खोरांनी कार्यभार उरकला होता. यामध्ये महसूल,शिक्षण, वन,पोलीस,पालिका व  वीज मंडळाचा चांगलाच प्रकाश पडला आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, खटाव तालुक्यातील लाचखोरांनी चांगलाच हात मारला आहे. भक्कम पुरावे सादर करूनही कायदेशीर पळवाट सापडत असल्याने वडूज मधील लाच लुचपत विभागाची धाड चांगलीच चर्चेत आली आहे. ती थेट न्यायालयात पोहचली आहे.

    काही महाभाग हे लाच खोरांसाठी मसीहा बनून थोडया लाभासाठी आपले इमान गहाण ठेवत असल्याने त्याची ही यानिमित्त नामावली पुढे येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार धाड घातलेल्या लोकांना तीन महिन्यानंतर कामावर घेतले जात असली तरी त्यांच्या म्होरक्यावर मोठी कारवाई होत नाही. हे सुध्दा सातारा जिल्ह्यात उघड झाले आहे. त्यामुळे लाच घेताना सापडलेल्या लोकांचे नामफलक सुध्दा संबधित कार्यालयात लावली पाहिजेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड, गौतम काकडे, तानाजी जगदाळे,वैभव गवळी, ऍड. नंदकुमार मोहिते, महारुद्र तिकुंडे व तक्रार दाखल करण्याऱ्यांनी केली आहे. त्याला चांगल्या विचारांच्या लोकप्रतिनिधींनी साथ दयावी असा सूर उमटत आहे.