
सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील आघोरी पूजाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल झाला आहे. तांत्रिक एका अल्पवयीन मुलीवर तंत्र मंत्राचा वापर करत अघोरी पूजा करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या मांत्रिकावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांडून केली जात आहे.
सातारा : सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील आघोरी पूजाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल झाला आहे. तांत्रिक एका अल्पवयीन मुलीवर तंत्र मंत्राचा वापर करत अघोरी पूजा करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या मांत्रिकावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांडून केली जात आहे.
वाई तालुक्यातील सुरूर गावच्या स्मशानभूमीत रविवारी दुपारच्या सुमारास ही पूजा सुरु होती. पुणे हडपसर येथून आलेले काही लोक यात सहभागी झाले होते. स्थानिकांनी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.
सुरूर येथे येण्याअगोदर या बालिकेला वाई येथील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात अली. या नंतर या मुलीला सुरूर येथे आणण्यात आले. स्मशानातच एक लाल रिंगण आखून त्यात या मुलीला बसवण्यात आले. तिच्या मांडीवर काळं कोंबड ठेवण्यात आले. मांत्रिक या मुलीवर काही तरी तंत्र मंत्र करत होता. मुलीच्या जवळच लिंबे आणि इतर पूजेचे साहित्य दिसत आहे.
स्थानिकांनी हा प्रकार पाहिल्यावर या पूजेत सहभागी झालेल्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याचे व्हिडिओ रेकॉर्डींग सुरु असल्याचे लक्षात येताच सर्वांनी अघोरी पूजा अर्धवट सोडून पळ काढला. स्मशानभूमीत घडलेल्या या प्रकाराचा यंत्रणेने शोध घेऊन अघोरी प्रकार उघडकीस आणावा अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. मांत्रिकाचा त्वरित शोध घेऊन जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी सातारा जिल्हा अंनिसच्या वतीने करीत आहोत.