कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या अंमल बजावणी साठी बैठकांचे सत्र ; पालिका सभागृहात पाणी पुरवठा विभागाचे प्राधिकरणासह नियोजन

कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा सर्वप्रथम आढावा पल्लवी चौगुले यांनी घेतला . ही पाणीपुरवठा योजनेची येत्या तीन महिन्यात करावयाच्या उपाय योजनांवर बैठकीत चर्चा झाली . गोळीबार मैदान परिसरात तोट्या नसणाऱ्या परिसराचा प्राधिकरणाने सर्वे करावा व करंजे ग्रामीण भागात कण्हेरचे पाणी पोहोचण्यासाठी तत्काळ जलवाहिन्यांची कामे पूर्ण करण्याच्या विषयावर सविस्तर मांडणी होऊन ते काम पूर्ण करण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शविली .

    सातारा : कण्हेर पाणी पुरवठा योजना येत्या तीन महिन्यात सुरु करण्यासाठी सातारा पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात संयुक्त बैठकांचे सत्र सुरु झाले आहे . आवश्यक ठिकाणी जलवाहिनी व नळतोट्यांसह शाहुपुरी च्या विस्तारीत क्षेत्रात नियोजित पाणी पुरवठा करण्याच्या विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा केली . या बैठकीला नगराध्यक्ष माधवी कदम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले , पाणी पुरवठा सभापती सीताराम हादगे पाणी पुरवठा अभियंता भाऊसाहेब पाटील , आरोग्य सभापती अनिता घोरपडे , समाज कल्याण सभापती संगीता आवळे , नगरसेविका आशा पंडित माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य आबा जरे यावेळी उपस्थित होते .

    कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा सर्वप्रथम आढावा पल्लवी चौगुले यांनी घेतला . ही पाणीपुरवठा योजनेची येत्या तीन महिन्यात करावयाच्या उपाय योजनांवर बैठकीत चर्चा झाली . गोळीबार मैदान परिसरात तोट्या नसणाऱ्या परिसराचा प्राधिकरणाने सर्वे करावा व करंजे ग्रामीण भागात कण्हेरचे पाणी पोहोचण्यासाठी तत्काळ जलवाहिन्यांची कामे पूर्ण करण्याच्या विषयावर सविस्तर मांडणी होऊन ते काम पूर्ण करण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शविली . विलासपूर भागातील तीस खातेधारकांन नळ कनेक्शन मिळालेले असताना वसुली मात्र प्राधिकरण करत आहे . भांडवली अंशदान व लोकवर्गणी यातून पालिका हद्दीत आलेल्या नागरिकांची सुटका करावी ही आग्रही मागणी करण्यात आली . आबा जरे यांनी विलासपूर भागाच्या पाणी नियोजनाचे वेळापत्रक ठरविण्याची मागणी केली तर विलासपूर ग्रामपंचायत आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत भाऊ साहेब पाटील यांनी हात वर केले . शाहुपुरी भागात 27 अंगणवाड्या असून त्यांना पाण्याची स्वतंत्र टाकी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली . वाढीव भागातील झोपड पट्टीसाठी स्वतंत्र कनेक्शन चा प्रस्ताव शासनाला पाठविणे , करंजे ग्रामीण व दौलतनगर येथे कण्हेर योजनेच्या जलवाहिन्यांची कामे पूर्ण करणे याशिवाय ग्रामपंचायतीने जी एक घर आड एक अशी कनेक्शन दिले आहे त्याचा आढावा घेऊन ही कामे तत्काळ पूर्ण करणे , प्राधिकरणाने कण्हेर योजनेचा सविस्तर नकाशा प्रसिद्ध करून प्राधिकरणाने नगराध्यक्षांशी कामांबाबत समन्वय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला . या पुढील आढावा बैठक १५ एप्रिल रोजी शाहपुरी येथील सातारा पालिकेच्या विभागीय कार्यालयात घेण्यात येणार असल्याचे सीता राम हादगे यांनी जाहीर केले .