साताऱ्यात शरद पवार व शशिकांत शिंदे यांची कमराबंद बैठक ; गोपनीय खलबतांमध्ये पराभवाची मीमांसा?

जावली सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी च्या आमदार शशिकांत शिंदे यांचा बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला . या पराभवाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली . शिंदे समर्थकांनी पराभवाच्या रागात राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले .

    सातारा : सातारा जिल्हा बॅकेतील आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादी ला जिव्हारी लागला आहे . राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी येथील शासकीय विश्राम गृहात शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद चर्चा केली . या चर्चेत नक्की काय खलबते झाली ? हे मात्र गुलदस्त्यात राहिले .

    जावली सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी च्या आमदार शशिकांत शिंदे यांचा बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला . या पराभवाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली . शिंदे समर्थकांनी पराभवाच्या रागात राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले . मंगळवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर असणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बॅक निकाला च्या घडामोडी लक्षात घेता कराडऐवजी सातारा विश्रामगृहात सायंकाळी उशिरा तळ दिला . विश्रामगृहाच्या अजिंक्यतारा दालनात आमदार शशिकांत शिंदे यांनी पवार यांची तत्काळ भेट घेतली . या भेटीत जिल्हा बॅकेत झालेल्या पराभवाची कारण मीमांसा व अनेक घडामोडींचा आढावा घेतल्याची चर्चा आहे . शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादी च्या अनेक नेत्यांना चुटपूट लावून गेला आहे . सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीरात्री उशिरा शासकीय विश्राम गृहात येऊन पवारांची भेट घेतली मात्र त्यांच्या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही .