Shashikant Shinde's shocking defeat in District Bank's high voltage election; Sharad Pawar arrives in Satara

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत(Shashikant Shinde's shocking defeat in District Bank's high voltage election; Sharad Pawar arrives in Satara).

    सातारा :  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत(Shashikant Shinde’s shocking defeat in District Bank’s high voltage election; Sharad Pawar arrives in Satara).

    शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबद्दल सातारच्या सर्किट हाऊस मध्ये राष्ट्रवादी नेत्यांशी बंद दारा आड चर्चा केली आहे. या बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ.शशिकांत शिंदे, खा.श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.