चिठ्ठीने तारलेले शेखर गोरे अखेर पोहचले जिल्हा बँकेत

विधान परिषद निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागला होता. त्यावेळी पराभव झाला असला तरी आज मात्र, त्यांना नशीबाने सात दिली. ओबीसी मतदार संघातून शेखर गोरे पराभूत झाले होते. मात्र, माण सोसायटी मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला.

    सातारा :  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. यामध्ये शिवसेनेचे नेते शेकर गोरे यांचा एका मतदार संघात पराभव झाला तर दुसऱ्या मतदार संघात ते चिट्ठीवर विजयी झाले. त्यामुळे गोरे यांचे जिल्हा बॅंकेत जाण्याचे स्वप्न साकार झाले.

    या निकालामुळे शेखर गोरे यांच्या या विजयाने सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीची आठवण झाली. त्या वेळी सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघातून याच तारखेला (२३ नोव्हेंबर) त्यांना पराभवचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढली होती. विधान परिषदेला त्यांना पराभवचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत शिवसेनेत प्रवेश केला होता. शेखर गोरे यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम विजयी झाले होते.

    आमदार शिंदेंनी मागितली माफी, पराभवामागे मोठे षडयंत्र
    विधान परिषद निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागला होता. त्यावेळी पराभव झाला असला तरी आज मात्र, त्यांना नशीबाने सात दिली. ओबीसी मतदार संघातून शेखर गोरे पराभूत झाले होते. मात्र, माण सोसायटी मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. माण सोसायटी गटात गोरे यांनी सर्वसमावेशक सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज सदाशिवराव पोळ यांना पराभूत केले. दोघांनाही प्रत्येकी ३६-३६ मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. शेखर गोरे यांचे नशीब आज रोजात होते त्यामुळे चिठ्ठीचा कौल त्यांना मिळाला. त्यामुळे गोरे चिट्ठीवर जिल्हा बॅंकेत पोहचले.

    दरम्यान, माण सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे व राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. जवळपास वर्षभरापूर्वीच मनोज पोळ यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे येथे मतदार व कार्यकर्त्यांची बैठक घेवून मनोज पोळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेत संचालक म्हणून जायचेच असा निर्धार करुन निवडणुकीची तयारी केली होती. आमदार गोरे हे निवडणूकीच्या मैदानात असणारच याबद्दल कोणालाही शंका नव्हती.