pratapgad

शिवप्रताप दिन गेली १७-१८ वर्षे सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडावर(pratapgad) सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवप्रताप दिन(shivpratap din) साजरा करण्यात येतो. मात्र किल्ल्यावरील ज्याठिकाणी अफजल खानाचा वध झाला ती शिवप्रतापाची जागा बंदिस्त आहे. ती खुली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सातारा: अफजल खान वध(afjhalkhan murder) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या(chatrapati shivaji maharaj) आयुष्यातील मोठा प्रताप आहे. हा शिवप्रताप दिन गेली १७-१८ वर्षे सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडावर(pratapgad) सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवप्रताप दिन(shivpratap din) साजरा करण्यात येतो. मात्र किल्ल्यावरील ज्याठिकाणी अफजल खानाचा वध झाला ती शिवप्रतापाची जागा बंदिस्त आहे. ती खुली करावी, जेणेकरून शिवभक्त युवक व नागरिकांना प्रेरणा मिळेल, देशातील व परदेशातील पर्यटकांना ही जागा पाहता यावी, अशी मागणी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.

याबाबत ‘श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन’चे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अत्याचारी, हिंसाचारी अफजलखानाचा कोथळा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी बाहेर काढला आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट परतवून लावले, तो हा दिवस आपण सर्वजण शिवप्रतापदिन म्हणून अभिमानाने साजरा करतो. हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अत्याचारी, हिंसाचारी अफजलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रताप आहे.

या शिवप्रतापामुळे समाजामध्ये राष्ट्रीय विचार व दहशतवाद विरोधामध्ये लढण्याची प्रेरणा मिळते. शिवरायांनी अफजलखानाचा वध करुन दहशतवाद हा असाच संपवायचा असतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. परंतु हा परिसर बंदिस्त असल्यामुळे अफजलखान वधाची जागा, अफजल खानाची व सय्यद बंडाची कबर, शिवाजी महाराजांचा प्रताप शिवभक्तांना, युवकांना, नागरिकांना, राज्यातील व परदेशातील पर्यटकांना पाहता येत नाही. हा प्रताप पाहून समाजामध्ये युवकांच्यामध्ये हे राष्ट्रीय विचार दहशतवादाविरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची हुशारीची व युद्धनीतीचीही जाणीव होते.त्यामुळे अफजलखान वधाच्या ठिकाणाचा व कबरीचा परिसर तातडीने सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्याचा निर्णय सातारा जिल्हा प्रशासनाने घ्यावा. हा निर्णय घेतल्यानंतर हा परिसर खुला करण्यासाठी कोणाचाही विरोध होणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. शिवरायांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर मृत्यूनंतर वैर संपते या भावनेतून अफजल खान व सय्यद बंडाची बांधलेली कबर सर्वांना पाहणी करण्यासाठी खुली केल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत नाही, असेही शिंदे म्हणाले.

एकीकडे गेली सतरा – अठरा वर्षे किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन हा अत्यंत आनंदात, उत्साहाने आणि शांततेने पार पडतो आणि दुसरीकडे या अफझल खान आणि सय्यद बंडा यांची कबर लोकांना पाहण्यासाठी बंद ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला सर्वात मोठा प्रताप, शिवरायांचे शौर्य पाहण्यासाठी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारा अफजल खान व सय्यद बंडा कबरीचा परिसर सर्वांना पाहण्यासाठी खुला करावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिवप्रताप भूमीवर जाण्यास सध्या मज्जाव
प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरु झालेले उदात्तीकरण शासनाने लक्ष घालून थांबवावे अशी मागणी विधानपरिषदेत नितीन शिंदे यांनी आमदार असताना केली होती. तसेच अफझलखानाचे सुरू असलेले उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्यावतीने मोठे शिवभक्तांचे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन अफझल खानाचे उदात्तीकरण थांबवून अफझलखान कबरीचा परिसर सील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आणि आज अखेर तो परिसर बंद आहे. अफजलखानाचा वध केलेल्या ठिकाणी तसेच अफजलखानाची कबर असलेल्या ठिकाणी कोणालाही जाण्यास सध्या  मज्जाव आहे.