निसरे येथील श्रध्दा हॉटेलची तोडफोड

निसरेविहीर येथे श्रीकांत विश्वास बामणे यांच्या मालकीचे श्रध्दा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बुधवार दि.२२ रोजी सायंकाळी अमर शरद भिसे याच्यासह अन्य काहीजणांनी प्रवेश करत हॉटेलची तोडफोड केली. सीसीटिव्ही कॅमेऱ्याची मोडतोड केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही दिली, असे मल्हारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

    पाटण : निसरे विहीर, ता. पाटण येथील श्रध्दा हॉटेलमध्ये घुसून हॉटेलची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान करत शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी मल्हरापेठ, ता. पाटण येथील अमर शरद भिसे याच्यासह अन्य दोघांविरोधात हॉटेलचे मालक श्रीकांत विश्वास बामणे यांनी मल्हारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

    याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निसरेविहीर येथे श्रीकांत विश्वास बामणे यांच्या मालकीचे श्रध्दा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बुधवार दि.२२ रोजी सायंकाळी अमर शरद भिसे याच्यासह अन्य काहीजणांनी प्रवेश करत हॉटेलची तोडफोड केली. सीसीटिव्ही कॅमेऱ्याची मोडतोड केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही दिली, असे मल्हारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मल्हारपेठचे सपोनि उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंकुशी करत आहेत.