सुर्ली ग्रामस्थांचे सहकार्य विसरणार नाही : बाळासाहेब पाटील

निवडणुका येतात जातात मात्र विकासाच्या दिंडीत सहभागी होणारे मोजकेच असतात. गावच्या विकासासाठी सुर्ली ग्रामस्थांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केलेले सहकार्य विसरणार नाही अशी ग्वाही सहकारमंत्री  बाळासाहेब पाटील यांनी दिली.

    औंध : निवडणुका येतात जातात मात्र विकासाच्या दिंडीत सहभागी होणारे मोजकेच असतात. गावच्या विकासासाठी सुर्ली ग्रामस्थांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केलेले सहकार्य विसरणार नाही अशी ग्वाही सहकारमंत्री  बाळासाहेब पाटील यांनी दिली.

    जिल्हा बँकेच्या चुरशीच्या लढतीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झालेबद्दल सुर्ली ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते.यावेळी हिंदकेसरी संतोषआबा वेताळ मंगलमूर्ती उद्योग समुहाचे संस्थापक नवनाथ पाटील युवा उद्योजक अमित फुके, वनवासमाचीचे उपसरपंच मनोज माने, शेखर माने,माजी उपसरपंच कृष्णात मदने हे उपस्थित होते.