शिंगणापूर  घाटात ४०० फूट  खोल दरीत कार कोसळली. मायलेकरांचा जागीच मृत्यू

अपघातात वृध्द हिराबाई सर्जेराव वावरे (वय७५ ) मुळ रा. थदाळे ता.माण व त्यांचा मुलगा गजानन सर्जेराव वावरे (वय ५८) मुळ रा.थदाळे ता.माण या दोन्ही मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच शिंगणापुर येथील ट्रेकर्स ग्रुप अपघात स्थळी दाखल झाले.परंतु ४०० फुट खोल दरीत कार कोसळल्याने दोन्ही मायलेकरांचा जागीच मृत्यु झाला.

    वावरहिरे : थदाळे येथील वि.का.स.सेवा निवडणुक असल्याने गजानन वावरे हे नाशिक येथील महिद्रा कंपनीत नोकरीला असल्याने ते मतदान करण्यासाठी (सोमवारी) ते मुळ थदाळे गावी आले.मतदान झाल्यानंतर परत नाशिकला जात असताना त्यांचा शिंगणापुर -नातेपुते मार्गावर असलेल्या भवानी घाटात सुमारे ४००फुट खोल दरी कार कोसळून अपघात झाला. या अपघातात वृध्द हिराबाई सर्जेराव वावरे (वय७५ ) मुळ रा. थदाळे ता.माण व त्यांचा मुलगा गजानन सर्जेराव वावरे (वय ५८) मुळ रा.थदाळे ता.माण या दोन्ही मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच शिंगणापुर येथील ट्रेकर्स ग्रुप अपघात स्थळी दाखल झाले.परंतु ४०० फुट खोल दरीत कार कोसळल्याने दोन्ही मायलेकरांचा जागीच मृत्यु झाला. ट्रेकर्स ग्रुप शिंगणापुर व मदतकर्ते यांनी खोल दरीतुन मृतदेह बाहेर काढले.त्यांनी या घटनेची माहिती संबधित कुटुंबाला व पोलिस यांना दिली. या अपघातात मायलेकरांचा मृत्यु झाल्याने थदाळे शिंगणापुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.