सहकारमंत्री विजयी तर गृहराज्य मंत्र्यांचा पराभव ; राष्ट्रवादीच्या बंडखोरीने आ. शशिकांत शिंदेचा पराजय

घार्गे यांनी दिला अजित पवारांना धक्का ; शिवसेनेच्या शेखर गोरेंची जिल्हा बँकेत एंट्री

  कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित असे पहावयास मिळाले. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा हायहोल्टेज लढतीत विजय झाला. तर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवास सामोर जावे लागले. जावळी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोरे उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी माजीमंत्री आ. शशिकांत शिंदे यांचाही १ मताने पराभव केला. तर शिवसेनच्या शेखर गोरे यांनी जिल्हा बँकेत एंन्ट्री केली असून प्रभाकर घार्गे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विजयश्री खेचून आणत धक्काच दिला.

  यंदाची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बंडोखरीने चांगली गाजली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालातून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला लागलेल्या बंडखोरीने जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलच्या ११ जागा बिनविरोध झाल्या. तर १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे यांच्यातील लढती हायहोल्टेज ठरल्या होत्या. शिवसेनेचे शेखर गोरे हे जिल्हा बँकेत एंन्ट्री करणार का? याविषयी उत्सुकता होती.

   शंभूराज देसाई १४ मतांनी पराभूत
  बुधवारी जाहीर झालेल्या निकालात जावळी सोसायटी मतदार संघातून आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांचा एक मताने विजय मिळवत आ. शिंदे गटाला धक्का दिला. पाटण सोसासटी मतदार संघात झालेल्या पारंपारिक लढतीत सत्यजित पाटणकर यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा १४ मतांनी पराभूत केले.

  सहकारमंत्र्यांना भाेसलेंची मदत कामी
  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड सोसायटी मतदार संघात राज्याचे सहकार तथा जिल्हाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरूध्द माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर याचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या झालेल्या हायहोल्टेज लढतीत भाजपाचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या मदतीच्या जोरावर ८ मतांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले. तर खटाव सोसायटी मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नंदकुमार मोरे यांनी चितपट करत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे १० मतांनी विजय खेचून आणला.

  कोरेगावात दाेघांना समान मते
  कोरेगाव मतदार संघातील उमेदवारांना समान मते मिळाली. येथे चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला. यात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची निकटवर्ती बंडखोर उमेदवार सुनिल खत्री विजयी झाले. तर माण सोसायटी मतदार संघातून शिवसेनेचे शेखर गोरे विजयी होत पहिल्यांदाच जिल्हा बँकेत एंन्ट्री केली.

  महिला गटात राष्ट्रवादीचा वरचष्मा
  महिला गटात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. कांचन साळुंखे १२९२ तर ॠतुजा पाटील १४४५ मते घेऊन विजयी झाल्या. तर ओबीसी प्रवर्ग गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदिप विधाते यांनी सर्वाधिक १४५९ मते घेत शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांचा पराभव केला.