वाईत बेरोजगारीचा पहिला बळी

    वाई : वाई तालुक्यातील चिंधवली गावातील महादेव संजय पवार (वय २७) हा तरुण एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीमध्ये अनेक वर्षापासून काम करुन कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावून प्रपंच चालवत  होता. शनिवारी (दि. १९) त्याने रहत्या घराच्या पाठी मागे असणारऱ्या कृष्णा नदी शेजारील बाबभीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    मजूरांवर उपासमारीची वेळ

    वाई तालुक्यातील अनेक गावांत काेराेनाने थैमान घातल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण वाई तालुका लॉकडाऊन केला. या काळात सर्व व्यवसाय उद्योग धंदे बंद करण्यात आल्यामुळे गोरगरीब मजूरांवर उपासमारीची वेळ अाली.  छोट्या मोठ्या  दुकानांमध्ये अल्प पगारावर काम करुन मुलांच्या शिक्षणासह प्रपंचाचा गाडा हाकताना त्यांचं जगणं मुश्िकल झालं. लॉकडाउमध्ये कामावर जाण्यासाठी वाहनच उपलब्ध नसल्याने अनेकांना आपल्या नोकरऱ्या गमवाव्या लागल्या. यामुळे तरुणांत नैराश्य पसरले. अनेक तरुण आत्महत्या सारख्या विचारांच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

    अचानक कामावरून कमी केले

    चिंधवली येथील महादेव संजय पवार याने बेराेजगारीला कंटाळून अात्महत्येचं पाऊल उचलल्याची चर्चा अाहे. ताे वाईच येथील एमआयडीसीमधील एका नामांकीत कंपनीमध्ये कामाला होता. परंतु १५ दिवसापूर्वी त्याला अचानकपणे कामावरून कमी करण्यात अाले. तेंव्हापासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यातून त्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बाेलले जाते. या घटनेने चिंधवली गावावर शोककळा पसरली आहे.