स्ट्रीट लाईटचे थकीत बिल सरकारनेच भरावे; भाजपचे वाई महावितरण कंपनीला निवेदन

    वाई : वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाई भाजपच्या वतीने महावितरण कंपनीला स्ट्रीट लाईटचे थकीत बिल ग्रामपंचायतीकडून न घेता महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले. हे निवेदन वाई भाजपच्या वतीने व विविध ग्रामपंचायतींच्या वतीने वाई येथे कार्यकारी अधिकारी महावितरण, तसेच प्रांताधिकारी वाई व गटविकास अधिकारी पंचायत समिती वाई यांच्याकडे देण्यात आले.

    १५ व्या वित्त आयोगाच्या पैशातून गावातील आरोग्य, पाणी पुरवठा, गटारे कामांसाठी खर्च करते. आता त्यातून स्ट्रीट लाईटची बिले भरण्यासाठी तरतूद ग्रामपंचायतीने करावी, असे सांगण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसणार आहे. म्हणूनच राज्य सरकारने फेरविचार करावा आणि ती स्वतः किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती मार्फत भरण्यात यावी.

    तसेच जर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर सर्व ग्रामपंचायती व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. हे निवेदन देताना युवा नेते यशराज भोसले, सचिन घाटगे, गजानन भोसले, रोहिदास पिसाळ, चंद्रकांत शेलार, यशवंत लेले, सागर जाधव, मयुर गाढवे, युवराज कोंढाळकर, विक्रम शिंदे, ज्ञानेश्वर कायनगुडे, प्रशांत जाधव, दीपक जाधव यांसह अनेक भाजपचे कार्यकर्ते व सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .