The human skull found in the Satara District Hospital premises disappeared and was found near the school two days later

सातारा जिल्हा रुग्णालय आवारात बुधवारी सकाळी कॅन्टीनच्या पाठीमागे मानवी कवटी (Human Skull) आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही कवटी अचनक गायब झाली आणि आता ही कवटी जिल्हा रुग्णालयाच्या आवारा समोरील सॅन्डपॉल स्कुल समोरील गेटच्या भिंतीलागत आढळून आली आहे.

  सातारा : सातारा जिल्हा रुग्णालय आवारात बुधवारी सकाळी कॅन्टीनच्या पाठीमागे मानवी कवटी (Human Skull) आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही कवटी अचनक गायब झाली आणि आता ही कवटी जिल्हा रुग्णालयाच्या आवारा समोरील सॅन्डपॉल स्कुल समोरील गेटच्या भिंतीलागत आढळून आली आहे.

  गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्हा रुग्णालय आवारात मानवी कवटी आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.. रुग्णालय परिसरात मानवी कवटी आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारा चव्हाट्यावर आला होता पण ती कवटी अचानक गायब झाली होती.ती मानवी कवटी नसल्याचे सांगत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी हात झटकले होते.

  मात्र, अखेर ती गायब झालेली कवटी पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या आवारा समोरील सॅन्डपॉल स्कुल समोरील गेटच्या भिंतीलागत आढळून आली आहे.
  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही कवटी ताब्यात घेतली आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022