ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाची साताऱ्यात मोर्चेबांधणी ; राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत राज्य शासनावर टीका

गुरुवारी राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत चक्का जाम आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली .शनिवारी जिल्हयात होणाऱ्या आंदोलनामध्ये दोन ते अडीच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून साताऱ्यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कोरेगाव चा रस्ता अडविण्यात येणार आहे .

    सातारा : इतर मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाच्या पुनर्रचनेशिवाय जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत याकरिता भाजप आक्रमक झाला आहे . गुरुवारी राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत चक्का जाम आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली .शनिवारी जिल्हयात होणाऱ्या आंदोलनामध्ये दोन ते अडीच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून साताऱ्यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कोरेगाव चा रस्ता अडविण्यात येणार आहे .

    येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या दालनातून भाजपाच्या जिल्हा कार्यकारीणीच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी ऑनलाईन बैठकीत चर्चा केली . मुंबई ठाणे व पालघर येथील पदाधिकाऱ्यांनी या व्हर्चुअल चर्चेत भाग घेतला . साताऱ्यातून यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर , प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी, भरत पाटील, जिल्हा सरचिटणीस शेखर वडणे, विट्ठल बलशेटवार, महेंद्र डुबल, भरत मुळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव शैलेंद्र तांदळे, दत्ताजी थोरात, खजिनदार किशोर गोडबोले, मंडलाध्यक्ष विकास गोसावी, राजेंद्र इंगळे, श्रीहरी गोळे, संतोष जाधव, रोहिदास पिसाळ, धनंजय चव्हाण, अनिरूध्द गाढवे, बजरंग गावडे, मधुकर बिरामणे एकनाथ बागडी , अमोल सस्ते उपस्थित होते .

    या बैठकीत भाजप केंद्र सरकारच्या सात वर्षातील विकास कामांच्या योजनांची माहिती देण्यात आली . या चर्चेत एकूण चार राजकीय ठरावांना मान्यता देण्यात आली . मराठा व इतर मागास प्रवर्ग आरक्षण टिकवण्यावर राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर प्रचंड टीका भाजप राज्य कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली .