डुकरांची मास विक्री वनविभागाच्या कचाट्यात ;  पाटण वनविभागाची कारवाई

डावरी, ता. पाटण येथील काहीजण डुकराचे मास विक्री करण्यात असल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाटण, मल्हारपेठ, बहुले, मोरगिरी येथील वनपाल व वनमजुरांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी आंब्याच्या झाडाखाली संंशयित आरोपी दशरथ विष्णू मोहिते, विलास शामराव सत्रे व सोमनाथ संपत तिकुडवे (सर्व रा. डावरी, ता. पाटण) हे जंगली डुकराचे मास विक्री करताना आढळून आले.

    पाटण : डावरी, ता. पाटण येथे डुकराचे मास विक्री केल्याप्रकरणी पाटणच्या वनविभागाने तिघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त केले आहे. सदर तिघांवर वन्यजीव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    डावरी, ता. पाटण येथील काहीजण डुकराचे मास विक्री करण्यात असल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाटण, मल्हारपेठ, बहुले, मोरगिरी येथील वनपाल व वनमजुरांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी आंब्याच्या झाडाखाली संंशयित आरोपी दशरथ विष्णू मोहिते, विलास शामराव सत्रे व सोमनाथ संपत तिकुडवे (सर्व रा. डावरी, ता. पाटण) हे जंगली डुकराचे मास विक्री करताना आढळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून डुकरावे मास, मास तोडण्यासाठी आणलेले साहित्य, तीन सतूर, पक्षी पकडण्याची जाळी आदी साहित्य हस्तगत करण्यात आले.

    तसेच त्यांच्यावर पाटण वनविभागात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याकामी उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार, वनपाल एस. बी. भाट, ए. डी. राऊत, व्ही. एम. चौरे, बी. ए. माने, वनरक्षक, डी. बी. बर्गे, वनमजूर आर. व्ही. कदम या पथकाने कार्यवाही केली.