शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत ; चिमुकल्यांना शाळा सुरु होण्याची लागली उत्सुकता

सध्या आॅनलाईन शिक्षण सुरु आहे.माञ या उपक्रमातुन विद्यार्थ्थांना शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याने त्यांचे अपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही तितकीशी सदृढ नसल्याने प्रत्येक पालकाकडे स्मार्ट फोन सुविधा नाही.तर काही पालकांकडे नेटवर्क नसल्याने आॅनलाईन शिक्षण घेता येत नाही.

    वावरहिरे : कोरोना महामारीने गेली दिड वर्षापेक्षा जास्त काळ शाळा बंद आहेत.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अंगणवाडी,बालवाडी,पहिलीला फक्त प्रवेश घेतले.परंतु गत वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळा पहाण्याचा योग्य आलाच नाही.घरीच थांबून, खेळून , बागडून कंटाळल्यामुळे चिमुकल्यांना आता शाळाची उत्सुकता लागली आहे.बच्चे कंपनी शाळा, अंगणवाडीच्या बोलक्या भिंतीकडे कुतुहलाने पहात आनंदी होताना दिसत आहेत.

    सध्या आॅनलाईन शिक्षण सुरु आहे.माञ या उपक्रमातुन विद्यार्थ्थांना शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याने त्यांचे अपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही तितकीशी सदृढ नसल्याने प्रत्येक पालकाकडे स्मार्ट फोन सुविधा नाही.तर काही पालकांकडे नेटवर्क नसल्याने आॅनलाईन शिक्षण घेता येत नाही.तसेच नेमक्याच विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण व्यवस्था मिळत असल्याने मनामध्ये भेदभावाचे विचार ञासदायक ठरत आहेत.त्यासाठी सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी शाळा सुरु होणे गरजेचे आहे.शाळा नसल्याने विद्यार्थी वर्ग अभ्यासात रमत नाहित.दिवसभर मिञाबरोबर खेळण्यात व्यस्त असतात. पालकसुद्धा आपल्या कामात व्यस्त असल्याने त्यांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेशा वेळ मिळत नाही.घरी बसुन विद्यार्थीही आता कंटाळल्याने त्यांना आता शाळा कधी सुरु होतेय यांची उत्सुकता लागलीय.चिमुकल्यांना शाळेसह अंगणवाडीच्या बोलक्या भिंतीकडे पहाताना आनंद होताना दिसत आहे.माञ शाळा कधी सुरु होणार हे निश्चित नसल्याने सध्यातरी बोलक्या भितींकडे पाहुनच समाधान मानावे लागत आहे. विशेष म्हणजे या हि शैक्षणिक वर्षात शाळेत बसुन शिक्षणासह मौज मजा करता येईल का? असा प्रश्न चिमुकल्या विद्यार्थ्यांना पडला आहे.