पाटणमध्ये सहा ठिकाणी चोऱ्या; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद

शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, गुरुवारी मध्यरात्री शहरात ४ घरे व २ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

    पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, गुरुवारी मध्यरात्री शहरात ४ घरे व २ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या चोऱ्यांची नोंद शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.

    गुरुवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील मुख्य पेठेतील अमोल अरुण खांडके यांच्या मालकीच्या न्यू कलाकीर्ती फोटो स्टुडिओच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने २ हजार ५०० रुपये, राजेंद्र गजानन टोपले यांच्या मालकीच्या त्रिमूर्ती सुईंग मशिन दुकानाच्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून एक हजार रुपये चोरून नेले. शेजारील एका घरात चोरीचा प्रयत्न झाला.

    तसेच नवीपेठ येथील प्रशांत चाळके यांच्या बंद घरातून २ हजार रुपये रोख चोरून नेले. तर शेजारील बादल विनायक इंगवले व सुजाता राजेंद्र घाडगे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. पाटण शहरात रात्रीत ४ घरे व २ दुकाने चोरट्यांनी फोडल्याने भीतीचे वातावरण आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

    संशयित दिसल्यास संपर्क साधावा

    दरम्यान, शहरात संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटण पोलिसांकडून करण्यात आले आहे.