
पुण्यातील शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्या प्रमाणे वटवाघळा मध्ये निपाह हा व्हायरस असला तरी या व्हायरसचा प्रादुर्भाव स्थानिक लोकांना कधीच झाला नाही निपाह या विषाणूची लक्षणे असलेला रूग्ण या भागात कधी आढळला नाही ज्या कोरोनाने जगात थैमान मांडले आहे त्या कोरोनाची लागण देखिल या गुहेजवळ असलेल्या मालुसर गावातील एकाही व्यक्तीला झाली नाही असा दावा या गावचे जेष्ठ नागरीक व माजी सरपंच इक्बाल मुलाणी यांनी केला
महाबळेश्वर: वटवाघळाद्वारे पसरणारा ‘निपाह’ हा व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ वायरोलाॅजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे तसा अहवाल त्यांनी नुकताच प्रसिध्द करताच राज्यात एकच खळबळ माजली आहे दरम्यान या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परीसरात नाही त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेला हा दाव्या बाबत शहरातून शंका व्यक्त केली जात आहे
महाबळेश्वर पासुन दहा किमी अंतरावर मालुसर वाडी हे गाव आहे या गावा पासुन एक किमी अंतरावर राॅबर्स केव्ह या नावाची गुहा आहे याला स्थानिक भाषेत सीमसीम घळ असेही म्हणतात या गुहेत गेली अनेक वर्षांपासून वटवाघळांची वसाहत आहे वटवाघळांच्या अनेक जाती आहेत परंतु महाबळेश्वरच्या जंगलातील या गुहेत वटवाघळाची जी जात आहे ती जगात अगर्दी दूर्मिळ आहे मार्च २०२० मध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ वायरोलाॅजीच्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांचे नमुने गोळा केले यावर त्यांनी संशोधन करून त्याचा अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे या अहवाला नुसार महाबळेश्वर येथील जंगलातील ज्या गुहेत वटवाघळांची दूर्मिळ प्रजातीची वटवाघळे आहेत त्यातील दोन वटवाघळांमध्ये निपाह हा अतिघातक व्हायरस सापडला आहे
निपाह हा व्हायरस कोरोना पेक्षा अधिक घातक आहे कारण कोरोनाचा मृत्यू दर हा दोन टक्के आहे परंतु निपाहचा मृत्यू दर हा ६५ ते १०० टक्के आहे असा घातक व्हायरस हा महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वरच्या जंगलात आढळल्याने तमाम महाराष्ट्रात या बाबत चांगलीच खळबळ माजली आहे गुहेची पाहणी साठी आज येथील काही पत्रकार गेले होते महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर सात किमी अंतर पार केल्यानंतर मालुसर गावाकडे जाणार रस्ता लागतो त्या रस्त्याने एक किमी पुढे गेले की गावाची वस्ती लागते त्या वस्तीतुन घनदाट जंगलातील पाय वाटेने गुहेकडे जाता येते तेथे गेल्या नंतर भला मोठा खडड्ा दृष्टीस पडतो खड्ड्यात थोडे उतरल्या नंतर पुन्हा विहीरीसारखा एक खड्डा आणित्या मधुन जमिनीखाली गेलेली गृहा दृष्टीस पडते याच गुहेत वटवाघळे असतात उन्हाळयात या ठिकाठी वटवाघळांच्या विष्ठेचा विशिष्ट उग्र वास येतो परंतु आता पावसाळी वातावरण असल्याने तेथे अशा प्रकारे कोणताही वास आला नाही वरून पाण्याचे प्रवाह या गुहेत पडत होते या गुहेला लागुनच एक साताआसरा देवीचे छोटे मंदीर आहे या मंदीरात पुजारी रोज येवुन देवीची पुजा करतो त्याच प्रमाणे याच भागात जे पठार आहे त्या पठारावर येथील स्थानिक लोक आपले घोडे गाई म्हशी चरण्यासाठी घेऊन येतात मंदीरातील देवीच्या दर्शनासाठीही परीसरातील भाविक या गुहे जवळ येतात
पुण्यातील शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्या प्रमाणे वटवाघळा मध्ये निपाह हा व्हायरस असला तरी या व्हायरसचा प्रादुर्भाव स्थानिक लोकांना कधीच झाला नाही निपाह या विषाणूची लक्षणे असलेला रूग्ण या भागात कधी आढळला नाही ज्या कोरोनाने जगात थैमान मांडले आहे त्या कोरोनाची लागण देखिल या गुहेजवळ असलेल्या मालुसर गावातील एकाही व्यक्तीला झाली नाही असा दावा या गावचे जेष्ठ नागरीक व माजी सरपंच इक्बाल मुलाणी यांनी केला
आज या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी देखिल निवेदन दिले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार निपाह हा विषाणु जरी धोकादायक असला तरी वटवाघळा मधुन मनुष्याला प्रादुर्भाव होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे त्या मुळे सध्यातरी या विषाणुमुळे घाबरण्याचे कारण नाही
एक ते दोन टक्का मृत्युदर असलेल्या कोरोना मुळे आधीच महाबळेश्वर सारखे पर्यटन स्थळावरील नागरीकांची आर्थिक घडी विस्कटली आहे आणि कोरोना पेक्षा अधिक घातक असलेला विषाणुचा प्रसार झाला तर महाबळेश्वर सारखे पर्यटन स्थळावरील नागरीकांच्या रोजी रोटीचा प्रश्न गंभिर होण्याचा धोका असल्याने या शहरातील लोका मधुन भितीचे वातावरण पसरले आहे त्यांनी आपल्या व्यवसाया बाबत चिंता व्यक्त केली आहे अनेकांच्या म्हणण्या प्रमाणे शास्त्रज्ञांनी केलेला हा दाव्याची सत्यता पुन्हा तपासून पाहीली पाहीजे आणि या मध्ये सत्यता असेल तर ती गुहा कायमची बंद करून तो व्हायरस हा गुहेतुन बाहेर येणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी माहणीही अनेक नागरीकांनी केली आहे.