सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलक युवत, युवतीशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले, शेजारी सुनील काटकर व कॉम्रेड आर्गनाझेशनचे पदाधिकारी (छाया : प्रकाश वायदंडे)
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलक युवत, युवतीशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले, शेजारी सुनील काटकर व कॉम्रेड आर्गनाझेशनचे पदाधिकारी (छाया : प्रकाश वायदंडे)

खासदार उदयनराजे भोसले यांनी युवकांना सध्याच्या परिस्थित दोन वर्षे वाया गेल्याचे वास्तव मान्य केले. मात्र, त्यावर सैन्य भरती किंवा इतर कोणत्याही शासकीय भरतीत वयाच्या शिथिलतेबाबत फारसे भाष्य केले नाही. तुम्ही प्रशासनाला मागण्यांचे पत्र द्या त्यावर काही तोडगा निघू शकेल असे सांगत आंदोलन मागे घ्या आणि भरतीच्या तयारीला लागा असा सल्ला दिला मात्र शेकडो युवकांच्या वयाच्या शिथीलतेबाबतचा प्रश्न प्रशासनाकडे अनुत्तरीतच राहिला.

    सातारा : कॉम्रेडस सोशल ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेकडो युवक, युवतींनी सैन्य भरती, पोलीस भरती घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरु केले. दुपारी आंदोलनस्थळी उदयनराजे भोसले यांनी भेट दिली व आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाशी याबाबत चर्चा केली. तेव्हा नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरु होईल, असा संकेत प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
    याबाबत आंदोलकांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही दोन वर्षे का गप्प बसला ? मला का भेटला नाही. त्यावेळीच याबाबत प्रशासनाकडे मागणी केली असती तर करोनाबाबतचे नियम पाळून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत प्रशासनाने सदर्न कमांडर यांना कळवले असते. आता दोन वर्षे वाया गेल्याने सैन्य भरती, पोलीस भरती बरोबरच इतर शासकीय विभागांच्या भरतीमध्ये देखील युवक, युवतींना वयाची अडचण येणारच आहे. त्यामुळे ही अडचण काही फक्त तुमची नसून सर्वांचीच आहे. त्यावर शासनाकडून तोडगा काढण्याची गरज आहे.

    आता प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्याबाबतही बोलणे झाले असून प्रशासनाकडून सैन्य भरती नोव्हेंबरमध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता युवकांनी वेळ न वाया घालवता प्रत्येक दिवस महत्वाचा समजून पुन्हा मेहनत घ्यावी व सैन्य भरतीमध्ये उतरावे. करोना आपल्या जन्माअगोदरपासूनच आहे. युवक, युवतींनी आपल्याकडे असलेल्या मोबाईलवर चित्रपट पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा अनेक अभ्यासपूर्ण व ज्ञानाच्या गोष्टी मोबाईलवर आहेत त्या वाचव्यात, असा सल्लाही खासदार उदयनराजेंनी आंदोलक युवक, युवतींना दिला.

    वयाच्या शिथीलतेबाबत प्रश्न अनुत्तरितच
    खासदार उदयनराजे भोसले यांनी युवकांना सध्याच्या परिस्थित दोन वर्षे वाया गेल्याचे वास्तव मान्य केले. मात्र, त्यावर सैन्य भरती किंवा इतर कोणत्याही शासकीय भरतीत वयाच्या शिथिलतेबाबत फारसे भाष्य केले नाही. तुम्ही प्रशासनाला मागण्यांचे पत्र द्या त्यावर काही तोडगा निघू शकेल असे सांगत आंदोलन मागे घ्या आणि भरतीच्या तयारीला लागा असा सल्ला दिला मात्र शेकडो युवकांच्या वयाच्या शिथीलतेबाबतचा प्रश्न प्रशासनाकडे अनुत्तरीतच राहिला. फक्त भरती नोव्हेंबरमध्ये होईल एवढेच समोर आले.