चकचकीत योजनांच्या गर्दीत टोलमाफी बासनात ; नितीन गडकरींनी पुसली सातारकरांच्या तोंडाला पाने

शनिवारी झालेल्या कराडा त झालेल्या पंचतारांकित दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची च चर्चा होती . गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी सातारा जिल्हयाची सर्वपक्षीय फळी व्यासपीठावर उपस्थित होती .

    केंद्रीय भुपृष्ठ व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी रोडकरी हे नाव शनिवारी झालेल्या सातारा जिल्हा दौऱ्यात सार्थ केले . तब्बल पाच हजार कोटींचे महामार्ग लोकार्पणाचा सोहळा वाजतगाजत पार पडला मात्र बुलेट ट्रेन, पुणे बेंगलोर नवीन महामार्ग, दुमजली फ्लायओव्हर अशा चकचकीत आश्वासनांमध्ये मात्र सातारकरांसाठी जिव्हाळ्याची ठरलेली टोल माफी मात्र वाहून गेल्याने गडकरींचा राजकीय दौरा सर्वसामान्यांसाठी तोंडाला पाने पुसणाराच ठरला .

    पश्चिम महाराष्ट्र , कोकण आणि गोवा या प्रादेशिक क्षेत्रांचे सुलभीकरण आणि विस्तारीकरण हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा गेल्या दशकभराचा अजेंडा कूर्मगतीने पुढे जात असल्याने ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्ग ठेकेदार कंपनी रिलायन्स इन्फ्राच्या निमित्ताने कायमच टीकेचा धनी ठरत आहे . मात्र गडकरी यांनी कराडात सातारा कागल सहापदरीकरणाचा लोकार्पण सोहळा थाटात उरकून सातारकरांना दिलासा दिला खरा पण महामार्ग प्राधिकरण व आयआरबी यांच्याकडून टोलमाफीचे भूत सातारकरांच्या डोक्यावरून उतरलेले नाही याची माहिती प्राधिकरणाच्याच अधिकाऱ्यांनी जाहीर केली . म्हणजे नितीन गडकरी यांची पुणे येथे केलेली टोल माफीची घोषणा म्हणजे राजकीय आश्वासनांचा खेळ होता हे स्पष्ट झाले . आनेवाडी टोल नाक्यावर बनावट पावत्यांचा खेळ, महामार्गावर सुविधांच्या नावाने असणारा ठणाणा, टोलनाका हस्तांतरणावरून साताऱ्यात झालेला राजकीय राडा, ठेकेदार कंपन्यांची मुजोरी, आणि व्यवस्थापनाचे उध्द ट कर्मचारी यामुळे हा आनेवाडी टोलनाका सातारकरांसाठी दुःस्वप्न ठरला आहे . नितीन गडकरी या टोल माफीवर ठोस बोलतील ही जोरदार अपेक्षा सुध्दा फोल ठरली . गडकरींच्या स्वागतासाठी महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाची गेल्या 48 तासाची चपळाई चर्चेचा विषय ठरली .एरव्ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना साताऱ्यात बैठकीला येणं होत नाही पण रोडकरीच्या प्रशासनात कर्तव्य कसूरी नेमकेपणाने टीपली जाते यामुळे सर्व शासकीय यंत्रणा कराडात झाडून उपस्थित होती . सातारकरांना चकचकीत आश्वासने ऐकायला मिळाली मात्र टोल माफी नाही मिळाली याची चर्चा करत सातारकरांनी परतीचा रस्ता पकडला .

    कराड दौऱ्यात सबकुछ गडकरी

    शनिवारी झालेल्या कराडा त झालेल्या पंचतारांकित दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची च चर्चा होती . गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी सातारा जिल्हयाची सर्वपक्षीय फळी व्यासपीठावर उपस्थित होती . गेल्या दहा वर्षात संपूर्ण देशात दहा लाख कोटीचे ५१००० हजार किलोमीटरचे रस्ते केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने बांधले याचा संदर्भ गडकरींनी भाषणात देत ग्रीन हायवे कॉरिडॉर, डबल डेक फ्लाय ओव्हर, बुलेट ट्रेन अशा मोठया विकास कामांची मोहिनी राज्य सरकारला घातली . तुम्ही भूसंपादन करा आमच्या मंत्रालयाकडे निधीची कमतरता नाही हे सांगायला ते विसरले नाही . सव्वापाच तासाच्या वास्तव्यात सगळीकडे गडकरी च व्यापून होते . त्यामुळे चकचकीत घोषणाबाजीचा सबकुछ गडकरी दौरा अशीच चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात झाली .