Tourist's car crashes in Mahabaleshwar, car crashes into bridge

अपघातात जखमी झालेले पर्यटक औरंगाबादमधील असून ते महाबळेश्वर येथे फिरायला आले होते. नाताळच्या सुट्टीनिमित्त पाच जण महाबळेश्वरमध्ये फिरालयला आले होते. महाबळेश्वर फिरुन झाल्यानंतर ते चारचाकीने साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले.

महाबळेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी होती. परंतु आता पर्यटन स्थळे पर्यटनास खुली केली आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडत आहेत. अनेक पर्यटन स्थळांवर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर फिरुन झाल्यावर परतत असताना चारचाकी वेण्णालेक पुलावुन नदी पात्रात पडल्याने भीषण अपघात झाला आहे.

अपघातात जखमी झालेले पर्यटक औरंगाबादमधील असून ते महाबळेश्वर येथे फिरायला आले होते. नाताळच्या सुट्टीनिमित्त पाच जण महाबळेश्वरमध्ये फिरालयला आले होते. महाबळेश्वर फिरुन झाल्यानंतर ते चारचाकीने साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले. परंतु चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट वेण्णा लेकच्या पुलावरुन नदीपात्रात कोसळली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेतली. परंतु त्याच्या अंगावर गाडी पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर चार प्रवासी पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.

अमित जोशी(४२) असे मृत कारचालकाचे नाव आहे. तो औरंगाबादचा रहिवासी आहे. तर गाडीतील इतर पर्यटक यशराज पाटील (१८) समरजीत बछिरे (१७) संकेत पाटील (१६) आणि आयुष शेडगे(१७) गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यावर जखमिंना तात्काळ उपचारासाठी मेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच कार चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

नाताळची सुट्टी असल्यामुळे आणि अनेक दिवासापासून बंद असलेली पर्यटन स्थळे खुली केल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच राज्यात थंडीची लहर असल्यामुळे अनेक भागांत धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.